For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेपाळच्या ‘प्रचंड’ सरकारचा पराभव

06:14 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
नेपाळच्या ‘प्रचंड’ सरकारचा पराभव
Advertisement

के. पी. शर्मा ओली यांच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन होण्याची शक्यता

Advertisement

वृत्तसंस्था / काठमांडू

नेपाळमध्ये पुन्हा सत्तापरिवर्तन होणार आहे. विद्यमान पंतप्रधान पुष्पकुमार दहल प्रचंड यांच्या सरकारचा नेपाळच्या संसदेत पराभव झाला आहे. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागणार असून विरोधी पक्षनेते के. पी. शर्मा ओली यांच्या नेतृत्वात नवे सरकार लवकरच स्थापन होण्याची शक्यता आहे.

Advertisement

प्रचंड यांच्या सरकारने आपले बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वास प्रस्ताव संसदेत मांडला होता. शुक्रवारी या प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. 275 सदस्यांच्या नेपाळ संसदेत बहुमतासाठी 138 सदस्यांची आवश्यकता होती. मात्र, प्रचंड यांच्या बाजूने केवळ 63 मते पडली. तर विरोधी पक्षांच्या बाजूने 194 मते पडली. त्यामुळे प्रचंड यांच्या सरकारने बहुमत गमाविल्याचे या मतदानातून स्पष्ट झाले.

दीड वर्षांमध्ये सत्तांतर

प्रचंड यांचे सरकार 25 डिसेंबर 2022 या दिवशी स्थानापन्न झाले होते. तेव्हापासून आतापर्यंतच्या काळात दोन वेळा या सरकारने बहुमत सिद्ध केले होते. मात्र, काही काळापूर्वी या सरकारमधील एक घटकपक्ष बाहेर पडल्याने सरकार पडणार हे स्पष्ट झाले होते. शुक्रवारच्या शक्तीपरीक्षणात हीच बाब सिद्ध झाली.

युतीचे सरकार येणार

के. पी. शर्मा ओली यांचा डावा पक्ष आणि नेपाळी काँग्रेस पक्षाचे नेते शेरबहादुर देऊबा यांच्यात नवी युती झाली आहे. या युतीचे सरकार आता या देशात येणार आहे. युती करताना झालेल्या ठरावानुसार दोन्ही नेते देशाचे प्रमुख पद संसदेच्या उर्वरित काळासाठी समसमान पद्धतीने वाटून घेणार आहेत, अशी माहिती आहे.

Advertisement
Tags :

.