For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वप्नेश शेर्लेकर यांच्यावर 15 कोटींचा बदनामीचा दावा

02:42 PM May 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्वप्नेश शेर्लेकर यांच्यावर 15 कोटींचा बदनामीचा दावा
Advertisement

‘हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ कंपनी उच्च न्यायालयात

Advertisement

पणजी : कारापूर-सर्वण येथील वादग्रस्त ‘हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ कंपनीच्या तथाकथित पंचतारांकित बांधकाम प्रकल्पातील गैरकृत्ये आणि बेकायदेशीर बाबी उघड केलेल्या स्वप्नेश शेर्लेकर यांच्याविरोधात कंपनीकडून 15 कोटी ऊपयांचा बदनामीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला आहे. स्वप्नेश शेर्लेकर यांनी या प्रकल्पासंबंधी आतापर्यंत जारी केलेले व्हिडिओ, ब्लॉग तसेच इतर प्रसारमाध्यमांचा वापर करून खोटी आणि बदनामीकारक माहिती पसरवून कंपनीची अप्रतिष्ठा केली आहे, असा दावा कंपनीकडून याचिकेत करण्यात आला आहे. शेर्लेकर यांना यासंबंधीची नोटीस पाठविण्यात होती. 6 मे रोजी झालेल्या पहिल्या सुनावणीवेळी त्यांच्या वतीने वकिलांनी हजेरी लावली, तर 7 मे रोजी दुसऱ्या वकिलांनी हजेरी लावून या खटल्याला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली.

Advertisement
Advertisement
Tags :

.