For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महुआ मोईत्रांवरील मानहानी खटला मागे

07:00 AM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
महुआ मोईत्रांवरील मानहानी खटला मागे
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

तृणमूल काँग्रेस नेते महुआ मोईत्रा यांच्याविऊद्ध दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेला मानहानीचा खटला वकील जय देहाद्राई यांनी मागे घेतला आहे. देहाद्राई यांनी याला ‘शांती अर्पण’ अर्थात ‘शांतता उपक्रम’ असे म्हटले आहे. देहाद्राई यांनी दिल्ली उच्च न्यायालयात हा मानहानीचा खटला दाखल केला होता. यामध्ये त्यांनी महुआकडे 2 कोटी ऊपयांची भरपाई मागितली होती. महुआ आपल्या विरोधात चुकीच्या, असभ्य आणि अपमानास्पद गोष्टी पसरवत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. महुआ मोईत्रा यांनी पैसे घेतल्याचा आणि संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप देहाद्राई यांनी गेल्या वषी केला होता. यानंतर महुआ यांची 8 डिसेंबर रोजी लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली. यानंतर महुआने जय देहाद्राई आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. मुहाआ यांनी देहादराई आणि दुबे यांना आपल्याविरोधात खोट्या आणि अपमानास्पद पोस्ट करण्यापासून थांबवण्याची मागणी केली होती. याचदरम्यान उच्च न्यायालयाने  दोन्ही पक्षांनी संयमाने वागण्याची शक्मयता असल्यास दोन्ही बाजूंनी केलेले आरोप आणि प्रति-आरोप सार्वजनिक क्षेत्राबाहेर ठेवले तर बरे होईल, असे न्यायाधीशांनी सांगितले.

Advertisement
Advertisement
Tags :

.