For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दीपश्रीच्या ‘भुलभुलैया’ अडकलेल्यांचे दणाणले धाबे

12:47 PM Nov 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
दीपश्रीच्या ‘भुलभुलैया’ अडकलेल्यांचे दणाणले धाबे
Advertisement

मध्यस्थ संदीप परबने उलगडली नेटवर्कची साखळी : कसून तपास करण्याचे म्हार्दोळ पोलिसांना आव्हान

Advertisement

फोंडा : बेरोजगारांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लाखो रूपयांना गंडा घालणाऱ्या दीपश्री सावंत गावस प्रकरणात माशेल येथील मध्यस्थ संदीप परबने केलेल्या गौप्यस्फोटात एकूण 44 जणांकडून घेतलेले सुमारे 3.88 कोटी रूपये दीपश्रीला आपण सुपूर्द केल्याची तक्रार केल्यानंतर आता म्हार्दोळ पोलिसांचे काम वाढलेले आहे. संदीप परब याने वकिलामार्फत जी लेखी तक्रार सादर केली आहे, त्यामधील 44 जणांची यादी पाहिल्यानंतर आणि त्यांनी दिलेल्या मोठमोठ्या रकमा पाहिल्यानंतर या घोटाळ्याची व्याप्ती किती गंभिर आहे, हे काल शुक्रवारी उघड झाले. कुणाकुणाकडून दीपश्रीला लाखो रुपये कसे पोहोचले याचा पर्दाफाश या तक्रारीने केला आहे.

वाढता वाढतच जाते नोकरी घोटाळ्याची यादी 

Advertisement

संदीप जगन्नाथ परबने म्हार्दोळ पोलिसस्थनाकात यासंबंधी सविस्तर यादी तक्रारीत जोडलेली आहे. यामध्ये काहींची सरकारी नोकरीसाठी वैद्यकीय चाचणी झालेली आहे. काहींची कागदपत्रांची पडताळणीसाठी नावे शार्टलिस्ट करण्याची बनावट कागदपत्रे दीपश्रीने मध्यस्थ संदीप परब याला दिलेली आहे. या लिस्टमध्ये काही संचालकाच्या बनावट स्टॅम्पसह सह्याही करण्यात आल्याने याकामी सत्य उजेडात आणण्यासाठी म्हार्दोळ पोलिसांना नाकीनऊ येणार आहे. तसेच एखाद्या राजकारणी किंवा दीपश्रीच्या गॉडफादरने हस्तक्षेप केल्यास हे तपासकार्य कितपत पारदर्शक होईल याची चिंता सद्या मध्यस्थाला तसेच गोमंतकीय जनतेलाही लागून राहिली आहे.

संदीपकडे पैसे देणाऱ्यांचे धाबे दणाणले

दीपश्रीने नोव्हेबर 2023 ते एप्रिल 2024 या कार्यकाळात आरोग्यमंत्र्याचे नाव वापरून वनखाते, नगर नियोजन खाते (टीसीपी), आरोग्य खात्यात सरकारी नोकरभरती करण्यात येणार असल्याचे सांगून हे पैसे उकळल्याचे उघड झाले आहे.

तुकाराम जल्मी यांच्याकडे रक्कम दिलेल्यांची नावे

संदीप परब याने पोलिस तक्रारीत दिलेल्या यादीनुसार तुकाराम जल्मी केरी फेंडा याच्याकडे पुढील रोकड दिलेल्या लोकांची नावे, पदे पुढीलप्रमाणे : प्रेरणा मयेकर (एलडीसी-टीसीपी-7 लाख), गौरेश जल्मी (वन अधिकारी, वनखाते-18 लाख), परेश काणकोणकर (एलडीसी, जीसुडा-8 लाख), शुभम सातोडकर (कनिष्ट अभियंता, जीसुडा-10 लाख), घनश्याम खोलकर (एमटीएस, टीसीपी-8 लाख), संगम गावकर (एमटीएस, टीसीपी-8 लाख), सुजय जल्मी (तांत्रिक साहाय्यक, पीडब्ल्युडी-15 लाख).

अमित नागवेकरकडून आलेली रक्कम

त्याच तक्रारीत अमित नागवेकर कवळे फोंडा यांच्यामार्फत मध्यस्थ संदीप परबकडे रक्कम देण्यात आलेल्या यादीमध्ये शुभम नागवेकर (ड्राफ्टमॅन, सर्व्हे विभाग-6 लाख), जय वेर्लेकर (कनिष्ट अभियंता, सर्व्हे विभाग-10 लाख), प्रथमेश रामनाथकर (एलडीसी, वनखाते-5 लाख), गौरी पेडणेकर  (शिक्षक, शिक्षण खाते- 6 लाख), रिचा बिचोलकर (तांत्रिक साहाय्यक, पीडब्ल्युडी-10 लाख), दीपेश सावळ (तांत्रिक साहाय्यक, पीडब्ल्युडी-10 लाख).

विघ्नेश शेटकडून दीपश्रीकडे पोहोचलेली रक्कम

विघ्नेश शेट, कुंभारजुवे यांच्याकडून मध्यस्थ संदीप परबमार्गे दीपश्रीला 5 लाख रूपये आरटीओ अधिकारी म्हणून वाहतूक खात्यात नोकरभरतीसाठी देण्यात आले होते. मुरलीधर हळर्णकर (ग्रंथपाल, शिक्षण खाते-11 लाख), संदीप परब (ड्राफ्टमॅन, टीसीपी- 3 लाख). दिगंबर शेट कासवाडा तळावली याच्याकडून मध्यस्थ संदीप परबला मिळालेले दिशा दिगंबर शेट (फार्मासिस्ट, हेल्थ सर्व्हैस-5 लाख), तृप्ती शेट (प्रयोगशाळा साहाय्यक, एफडीए-3 लाख). गुरूदास नाईक शिरोडा यांच्यामार्फत संदीप परब यांना गायत्री गुरूदास नाईक (स्टेनोग्राफर, वनखाते-17 लाख), अक्षय देवीदास (एलडीसी, वनखाते-12 लाख). यांनी दिले.

वाढता वाढे लाखोंची यादी 

सुधा साळगावकर, सावर्डे हिच्यामार्फत परबकडे देण्यात आलेल्या यादीमध्ये सुचिता फट्टो (एलडीसी, वनखाते -7 लाख), सिंधूरा साळगावकर (एलडीसी, वनखाते-7 लाख), कनिष्का साळगावकर (एलडीसी,  वनखाते- 7 लाख), सचित हळणकर (खलाशी, नदी परीवहन-5 लाख), प्रितेश गावस वाळपई (एलडीसी, वनखाते-5 लाख), विशाल गावकर खांडोळा (एलडीसी, वनखाते-5 लाख), सुगम नाईक गावकर खांडोळा माशेल (कनिष्ट अभियंता, जीसुडा-14 लाख), संदेश शशिकांत परब खांडोळा (एलडीसी, जीसुडा-10 लाख). प्रज्योत गावस आमोणे डिचोली याच्यामार्फत मध्यस्थ संदीप परबमार्गे दीपश्रीला शितल गावस (एलडीसी, टीसीपी-3 लाख), नारायण परब  (एलडीसी, वनखाते - 3 लाख)s यांनी दिलेली रक्कम आहे.

बाणस्तारीच्या दामोदरकडून मिळालेली रक्कम 

दामोदर नाईक बाणस्तारी यांच्यामार्फत मध्यस्थ परबकडूक दीपश्रीला देण्यात आलेल्या यादीमध्ये अभिजीत नाईक (अबकारी निरीक्षक, अबकारी खाते-10 लाख), कौशिक नाईक (अबकारी उपनिरीक्षक, अबकारी खाते-10 लाख), रूची नाईक (गट विकास अधिकारी, पंचायत संचलनालय- 20 लाख), रिषभ हळर्णकर (खलाशी, नदी परिवहन-3 लाख), अपर्णा आरोंदेकर (एलडीसी, वनखाते-5 लाख), सुफियान खान (तांत्रिक साहाय्यक, पीडब्ल्युडी-10 लाख) यांनी दिले. देवेंद्र चोडणकर ओल्ड गोवा (अबकारी उपनिरीक्षक, अबकारी खाते -10 लाख), जया नाईक ओल्ड गोवा (अबकारी उपनिरीक्षक, अबकारी खाते -10 लाख),मंदार पाटील पर्रा बार्देश (अबकारी उपनिरीक्षक, अबकारी खाते -20 लाख),सुरज चोडणकर एकोशी (अबकारी उपनिरीक्षक, अबकारी खाते -10 लाख), राधा नाईक कारापूर सांखळी (अबकारी उपनिरीक्षक, अबकारी खाते -17 लाख),  वंशिका मोरजकर हेडलॅड सडा वास्को (समुपदेशक, हेल्थ सर्व्हीस -5 लाख), निवृत्ती मडकईकर खोर्ली (एलडीसी, टीसीपी-3 लाख), अरूंधती गावडे आगापूर (स्टेनोग्राफर, टीसीपी-5 लाख). या सर्व सुशिक्षितांची पुंजी सरकारी नोकरीच्या आमिषाच्या भुलभुलैयात अडकलेली आहे.

Advertisement
Tags :

.