विजयदुर्ग किल्ल्यावर १ जानेवारीला दीपोत्सव
देवगड - प्रतिनिधी
विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्यावतीने १ जानेवारी रोजी विजयदुर्ग किल्ल्यावर दुपारी ३.३० वा. 'किल्ले विजयदुर्ग दीपोत्सव २०२४' चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिवकालीन युद्धकलेची व मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, दिल्ली येथे सादरीकरण झालेले व राज्यात प्रथम आलेले 'सव्यसाचि गुरूकुलम् कोल्हापूर' हा कार्यक्रम तसेच शिवप्रेमींच्या ५० मशालींसह पाच हजार पणत्यांचा भव्य दीपोत्सव साजरा केला जाणार आहे.
विजयदुर्ग पंचक्रोशीतील विजयदुर्ग, रामेश्वर, गिर्ये या तिन्ही ग्रामपंचायत ग्रामस्थांसह सडेवाघोटन, नाडण, पडेल, वाडा, मोंड, वाघोटन, सौंदाळे, तिर्लोट येथील शिवप्रेमी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 'एक पणती मावळ्यांसाठी व एक दिवा सैनिकांसाठी' अशा हेतूने मानवंदना देण्यासाठी या आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीसह ढोलताशांच्या गजरात ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा जपत मिरवणुकीने ही मानवंदना देण्यात येणार आहे. सागरी सीमामंच कोकण प्रांतच्यावतीने शिवकालीन शिडाच्या बोटी दीपोत्सवाच्या दिवशी किल्ले विजयदुर्ग येथे येऊन छत्रपती शिवराय, मावळे आणि सैनिकांना अभिवादन करण्यात येईल .