महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोकमान्य श्रीराम मंदिरात दीपोत्सव साजरा

11:29 AM Nov 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शेकडो दिव्यांनी उजळले मंदिर : विविध मान्यवरांचा सत्कार

Advertisement

बेळगाव : आचार्य गल्ली, गाडेमार्ग-शहापूर येथील लोकमान्य श्रीराम मंदिरात शनिवारी दीपोत्सव कार्यक्रम पार पडला. जीवनविद्या मिशनच्या महिला नामधारकांनी टाळ-मृदंगाच्या गजरात संगीताच्या तालावर हरिपाठ सादर केला. स्वरा पाटील हिने जीवनविद्या मिशनविषयी माहिती दिली. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे व्हा. चेअरमन अजित गरगट्टी यांच्या हस्ते प्रभु श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांच्या मूर्तीला पुष्पहार घालण्यात आला. लोकमान्यचे संचालक व श्रीराम मंदिरचे ट्रस्टी सुबोध गावडे यांच्या हस्ते प्रवचनकार मधुरा शिरोडकर, संचालक पंढरी परब यांच्या हस्ते कविता मोदगेकर व सीईओ अभिजीत दीक्षित यांच्या हस्ते प्रभाकर देसाई तसेच लोकमान्यचे सीएसओ निवृत्त कर्नल दीपक गुरूंग यांच्या हस्ते ओमकार लोहार यांचा सत्कार करण्यात आला. दिव्यांनी संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाला होता. मंदिराचे पुजारी चिदंबर ग्रामोपाध्ये यांनी मंगलाष्टका म्हणून तुलसी विवाह केला. यानंतर उपस्थितांना तीर्थप्रसादाचे वितरण करण्यात आले. पीआरओ राजू नाईक व मंदिराचे सेवेकरी सुधीर कालकुंद्रीकर, तानाजी पाटील, कस्तुरी बडिगेर यांनी दीपोत्सवसाठी सहकार्य केले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article