‘लव अँड वॉर’मध्ये दीपिकाची एंट्री
संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट ‘लव अँड वॉर’ची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. चित्रपटात आलिया भट्ट, रणवीर कपूर आणि विक्की कौशल हे मुख्य भूमिकेत आहेत. तर आता चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदूकोनची एंट्री झाली आहे. तसेच सोशल मीडिया सेंसेन ओरी देखील यात दिसून येणार आहे.
दीपिका या चित्रपटात कॅमियो भूमिका साकारणार आहे. तर ओरी यात खास भूमिकेत दिसून येईल. लव अँड वॉर चित्रपटात आलिया ही कॅबरे डान्सरच्या भूमिकेत असून रणवीर कपूर आणि विक्की कौशल हे मुख्य नायक असतील. दोघेही सैन्याधिकारी म्हणून व्यक्तिरेखा साकारणार आहेत. हा चित्रपट 20 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.
दीपिका यापूर्वी कल्कि 2898 एडी या चित्रपटात दिसून आली होती. 8 सप्टेंबर रोजी तिने एका मुलीला जन्म दिला होता. सध्या ती स्वत:च्या मुलीला अधिक वेळ देत आहे. तर आलिया ही यापूर्वी जिगरा या चित्रपटात दिसून आली होती. पुढील काळात ती अल्फा या चित्रपटात शर्वरी वाघसोबत झळकणार आहे.