विक्की कौशलसोबत झळकणार दीपिका
बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल सध्या अनेक चित्रपटांमध्ये काम करतोय. याचदरम्यान आता तो दीपिका पदूकोनसोबत एका चित्रपटात दिसून येणार आहे. मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर कॉमेडी युनिव्हर्समध्ये दीपिका दिसून येणार असल्याचे मानले जातेय. तर दोघांची जोडी चित्रपट ‘महावतार’मध्ये दिसुन येण्याची शक्यता आहे. दीपिका या चित्रपटातील एका भूमिकेसाठी योग्य असल्याचे निर्मात्यांचे मानणे आहे. निर्मात्यांनी याकरता दीपिकासोबत बोलणीही सुरू केली आहेत. चित्रपटासाठी दीपिकाचे नाव जवळपास निश्चित आहे. यात तिची भूमिका विक्की कौशलप्रमाणेच दमदार असणार आहे. तर दिग्दर्शन अमर कौशिक करत असून त्याने मॅडॉक फिल्म्सच्या अनेक चित्रपटांचे यापूर्वी दिग्दर्शन केले आहे. दीपिका यापूर्वी कल्कि 2 आणि स्पिरिट यासारख्या चित्रपटांमधून बाहेर पडली होती. तर दुसरीकडे तिच्याकडे आणखी काही चित्रपटांच्या ऑफर्स आहेत.
विक्की कौशल हा बॉलिवूडमधील सध्याचा सर्वात दमदार अभिनेता म्हणून ओळखला जात असल्याने दीपिकासोबत त्याची जोडी पाहणे चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.