दिपीकाने मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
मुंबई
आठवा 'परिक्षा पे चर्चा' या कार्यक्रम नुकताच संपन्न झाला आहे. या कार्यक्रमाचा एक टीझर दिपिकाने आपल्या इन्स्टाग्रामवरून चाहत्यांशी शेअर केला. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याविषयी चर्चा करण्यात आली. 'परिक्षा पे चर्चा' याचा भाग होण्याची संधी मिळाल्याबद्दल बॉलीवूडची स्टनिंग स्टार दिपीका पादुकोण हीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
याप्रसंगी दिपिका म्हणाली, मी माझ्या लहानपणी अतिशय दंगेखोर विद्यार्थिनी होते. नेहमी सोफा, टेबल, खुर्चीवरून उड्या मारयचे. शाळेतही मी खूप दंगा करायचे. गणितात तर मी खूपच कमकुवत होते. आत्ताही गणित फारसं जमत असं नाही. यावेळी तिने तिच्या शालेय जीवनातील काही आठवणीही सांगितल्या.
हा संपूर्ण कार्यक्रम १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता प्रदर्शित होईल.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इयत्ता आठवी च्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधला. याप्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले, एखाद्या परिक्षेमध्ये अपयश आल्याने विद्यार्थ्यांचे आयुष्य थांबणार नाही आहे. अपयशातून शिकले पाहीजे. तुम्ही खूप भाग्यवान आहात, की तुम्ही टेक्नॉलॉजीच्या युगात जन्म घेतला आहे. त्यामुळे त्याचा योग्य ते वापर करुन आपली गुणवत्ता सुधारा. अशा प्रकार पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.