कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लेकीसह दिसली दीपिका पादुकोण

12:16 PM Dec 10, 2024 IST | Pooja Marathe
Deepika Padukone seen with her daughter
Advertisement

बेंगलुरु 

Advertisement

नुकतीच अभिनेत्री दीपिका पादुकोण ही बेंगलोर एअरपोर्टवर दिसली. बेंगलुरु च्या एअरपोर्टवरून लाडकी लेक दुआ सोबत जाताना दिसली. दुआच्या जन्मानंतर दीपिका सार्वजनिक ठिकाणी दिसत नसल्यामुळे सर्वत्र एकच चर्चा सुरु झाली. सप्टेंबर महिन्यात दुआच्या जन्मानंतर दीपिकाने पब्लिक अॅपिअरन्स देणं बंद केलं होतं. पण परवाच दिलजीत दोसांझच्या लाईव्ह कॉन्सर्टला ती दिसली.

Advertisement

त्यानंतर तिच्या चाहत्यांनी एकच दंगा सुरु केला. या कार्यक्रमातही तिने स्टेजवरून चाहत्यांशी संवाद साधला. त्यानंतर तिचे एअरपोर्टवरचे लेकीसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. चाहते रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणच्या लेकीची एक झलक पाहण्यासाठी वाट पाहत आहेत. पण यावेळी दीपिकाने आपल्या लेकीला उराशी इतकं घट्ट कवटाळून घेतलेलं की तिची एक झलकही नाही दिसू शकली. पण दीपिका सार्वजनिक ठिकाणी जात नसली तरी सोशल मिडीयावरून नेहमी अॅक्टीव्ह असते. तिने नुकताच लाडक्या दुआच्या पायाचा फोटो शेअर केला होता. तिने इन्स्टाग्रामवरून एक स्टोरी शेअर केली. ज्यामध्ये आई झाल्यानंतर  तिची अवस्था  कशी असल्याचे चाहत्यासोबत शेअर केले होते.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article