महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘द व्हाइट लोटस’मध्ये दीपिका

06:35 AM Jan 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आणखी एका हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये झळकणार

Advertisement

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदूकोनला आणखी एक हॉलिवूड प्रोजेक्ट मिळाला आहे. दीपिका लवकरच लोकप्रिय वेबसीरिज ‘द व्हाइट लोटस’च्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसून येणार आहे. यात ती जेनिफर कूलिज, थियो जेम्स आणि ऑब्रे प्लाजा यासारख्या प्रसिद्ध कलाकारांसोबत काम करणार आहे.

Advertisement

एचबीओची प्रसिद्ध सीरिज द व्हाइट लोटसमध्ये दीपिका महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. यासंबंधी निर्माते तसेच दीपिकाकडून अधिकृत पुष्टी अद्याप देण्यात आलेली नाही. द व्हाइट लोटस ही एक एमी-विनिंग सीरिज असून याच्या मागील सीझनमध्ये थियो जेम्स, जेनिफर कूलिज आणि ऑब्रे प्लाजा यासारखे कलाकार दिसून आले होते.

दीपिकाचा ‘फायटर’ हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ऋतिक रोशन, अनिल कपूर, करण सिंह ग्रोवर आणि संजीदा शेख हे कलाकार दिसून आले आहेत. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश देखील मिळत आहे. तर पुढील काळात दीपिका ही ‘कल्कि 2898 एडी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात प्रभास मुख्य भूमिकेत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article