महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उत्तराखंड पोलीस महासंचालकपदी दीपम सेठ

06:09 AM Nov 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

1995 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी

Advertisement

वृत्तसंस्था/ देहरादून

Advertisement

1995 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी दीपम सेठ यांनी उत्तराखंड पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार सोमवारी स्वीकारला आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक स्तरीय अधिकाऱ्यांनी त्यांचे यावेळी अभिनंदन केले आहे. उत्तराखंडमध्ये कायदा-सुव्यवस्था उत्तम ठेवण्यासाठी काम केले जाणार आहे. तसेच उत्तराखंडमध्ये सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यावर सर्वाधिक लक्ष असेल. वाहतूक व्यवस्थेवरूनही देखील प्रभावी योजना तयार केली जाणार असल्याचे सेठ यांनी पदभार स्वीकारल्यावर बोलताना सांगितले आहे.

उत्तराखंड पोलीस सर्व प्रकारच्या आव्हानांचा सामना करण्यास सक्षम आहेत. गुन्हेगारांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. फरार गुन्हेगारांना अटक करण्यासाठी मोहीम हाती घेतली जाईल. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पडताळणी प्रक्रियेला वेग दिला जाणार आहे. निष्काळजीपणा दाखविणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार असल्याचे सेठ यांनी म्हटले आहे. राज्याच्या मुख्य सचिव राधा रतूडी यांची नवनियुक्त पोलीस महासंचालक दीपम सेठ यांनी भेट घेतली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article