For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

मालवणमध्ये सामाजिक बांधिलकीचे दर्शन; उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्याकडून देऊळवाडा येथील श्री ईस्वटी महापुरुष मंदिराला साहित्य भेट

05:45 PM Oct 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
मालवणमध्ये सामाजिक बांधिलकीचे दर्शन  उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्याकडून देऊळवाडा येथील श्री ईस्वटी महापुरुष मंदिराला साहित्य भेट
Advertisement
मालवण, प्रतिनिधी : सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने मालवणचे उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी देऊळवाडा येथील श्री ईस्वटी महापुरुष मंदिराला सुमारे 200 ताटे आणि वाट्या भेट दिल्या. कोजागरी पौर्णिमा उत्सवानिमित्त मंदिरात आयोजित धार्मिक कार्यक्रमांसाठी ही मदत उपयुक्त ठरणार आहे. त्यांच्या या उपक्रमाबद्दल मंदिर मंडळ आणि उपस्थित नागरिकांनी आभार व्यक्त केले.

श्री ईस्वटी महापुरुष मंदिरात कोजागरी पौर्णिमेनिमित्त धार्मिक विधी, ब्राह्मण भोजन आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत असल्याने प्रसाद वितरणासाठी ताटे-वाट्यांची आवश्यकता लक्षात घेऊन दीपक पाटकर यांनी हे साहित्य भेट दिले. सामाजिक आणि धार्मिक कार्यात प्रत्यक्ष योगदान देण्याच्या त्यांच्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

Advertisement

यावेळी बोलताना दीपक पाटकर म्हणाले, “जनतेची सेवा हेच आपले पहिले कर्तव्य आहे. हीच शिकवण खासदार नारायण राणे साहेबांकडून मिळाली आहे. आमदार नीलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी आपण कटिबद्ध आहोत.” सामाजिक व धार्मिक कार्यात योगदान देण्याचा प्रयत्न यापुढेही सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात पुणे येथे आयोजित रील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारे मालवणचे रीलस्टार सिद्धेश चव्हाण यांचा दीपक पाटकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या यशाबद्दल उपस्थितांनी अभिनंदन केले.

Advertisement

यावेळी नगरसेविका निना मुंबरकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शिवसेना शहरप्रमुख राजू बिडये, गणेश परब यांसह श्री ईस्वटी महापुरुष मंडळ येथील राजन (बाबू) बगाड, राजू किर, महेश दाभोलकर, अमित बोर्डवेकर, शामा आजगावकर, रुपेश कोकरे, अर्जुन चव्हाण, विनायक खानोलकर, संजय खानोलकर, सुरेश खानोलकर, दर्शन मुंबरकर, प्रशांत माणगांवकर, निलेश चव्हाण, सिद्धेश चव्हाण, नितेश मोरये, प्रकाश माणगावकर, अमोल कामतेकर, भूषण मुंबरकर, हरेश मुंबरकर, तेजस मुंबरकर, गौरव सोनवडेकर, रुद्र खानोलकर, प्रणव चव्हाण, हार्दिक दाभोलकर, जेनील आजगावकर, जयेश लुडबे, नंदन लुडबे, माहिका आजगावकर, मधुकर आजगावकर, दिगंबर बगाड, गणेश मुंबरकर, माधुरी दाभोलकर, संगीता लुडबे, विद्या खानोलकर, ज्योतीप्रकाश माणगावकर, अनिता मुंबरकर, शैलजा मुंबरकर, रूपा दाभोलकर, विजया किर, कुंदा पवार, सायली आजगावकर, सुष्मा मुंबरकर, कल्पिता आजगावकर, अश्विनी चव्हाण, साक्षी चव्हाण, नंदा सोनवडेकर, शांती मुंबरकर आणि संगीता चव्हाण यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.