For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुडाळ केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या अध्यक्षपदी दीपक परब

कुडाळ  केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या अध्यक्षपदी दीपक परब
Advertisement

कुडाळ/ वार्ताहर : कुडाळ तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या अध्यक्षपदी दीपक परब यांची,उपाध्यक्षपदी शिवराम पणदूरकर,तर सचिवपदी संदीप गावडे यांच्यासह अन्य तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा कार्यकारिणीसाठी पाच संचालकाचीही एकमताने निवड करण्यात आली. वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी कुडाळ तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेची पूर्वनियोजित वार्षिक सर्वसाधारण सभा मराठा समाज सभागृहात आयोजित करण्यात आली होती.जिल्हा संघटनेच्या नवीन कार्यकारिणी मंडळासाठी तसेच कुडाळ तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी सदर सभा बोलावली आली होती.
जिल्हा संघटनेच्या निर्देशानुसार जिल्हा निरीक्षक व निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रवीण नाईक ( दोडामार्ग ) यांच्या निरीक्षणाखाली निवड ही प्रक्रिया राबविण्यात आली.
जिल्ह्यातील पाच संचालक आणि तालुका संघटनेचे नूतन पदाधिकारी यांची एकमताने निवड करण्यात आली. जिल्हा कार्यकारिणी संचालक म्हणून अभय नाईक , प्रसाद तेरसे, सूर्यकांत नाईक,. हरिश्चंद्र लंगवे व मंदार भिसे यांची निवड करण्यात आली. कुडाळ तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेची उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. खजिनदार- राजेश तेली ,सहसचिव- मुबीन दोस्ती , संघटन सचिव- बाबुराव शेळपकर, सल्लागार - आपा सावंत,पीआरओ- जयवंत म्हाडगुत यांची निवड करण्यात आली.
जिल्हा संघटनेसाठी कार्यकारी मंडळ तसेच कुडाळ तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्यावतीने नवीन निवड पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचे जिल्हा निरीक्षक श्री नाईक यांनी तसेच संघटनेच्या सभासदांनी अभिनंदन केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.