मंत्री दीपक केसरकरांच्या प्रचाराचा ओटवणेत शुभारंभ
विजयासाठी रवळनाथ चरणी घातले साकडे
ओटवणे प्रतिनिधी
भाजपा ,शिवसेना ,राष्ट्रवादी महायुतीचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ ओटवणे गावात करण्यात आला. यावेळी मंत्री दीपक केसरकर यांच्या विजयाच्या चौकारासाठी जागृत देवस्थान रवळनाथ पंचायतन देवस्थानला या देवस्थानच्या मानकऱ्यांनी साकडे घातले.
यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी संस्थानची गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या ओटवणे गावाच्या विकासासाठी गेल्या पंधरा वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी देण्यात आलेला असून येथील जागृत देवस्थान मंदिर सुशोभीकरणासाठीही लाखो रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे. यापुढेही ओटवणे गावाच्या सर्वांगीण विकासासह या देवस्थानच्या जीर्णोद्धार व सुशोभीकरणासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली.
यावेळी ओटवणे सरपंच दाजी गांवकर, गाव प्रमुख रविंद्र गांवकर, माजी उपसरपंच बाबाजी गांवकर, माजगाव शिवसेना विभाग प्रमुख उमेश गांवकर, ग्रामपंचायत सदस्य महेश चव्हाण, प्रशांत बुराण, सौ मनाली गांवकर, कु. अस्मीता भगत, शिवसेना महिला उपजिल्हा संघटक सौ उत्कर्षा गांवकर, दत्ताराम गावकर, जयसिंग गावकर, पंकज गावकर, नंदू शिरोडकर, सुधाकर तारी, गुंडू जाधव, श्रीकांत गावकर सुभाष गावकर, बाळकृष्ण भगत, जगन्नाथ जाधव, मनोज नाईक, रामदास गावकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.