दोडामार्गच्या दीपक बुगडे यांना समाजसेवक पुरस्कार जाहीर
दोडामार्ग – वार्ताहर
दोडामार्ग शहरातील दीपक महादेव बुगडे यांना हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था कराड यांच्या वतीने देण्यात येणारा ७ वा राष्ट्रीय गोमंतक गोवा पुरस्कार २०२५ मधील सामाजिक क्षेत्रातील समाजसेवक हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गुण गौरव व्हावा या उद्देशाने हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था कराड काम करत असते. या संस्थेकडे अनेकांचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. मात्र यावर्षीचा राष्ट्रीय गोमंतक गोवा पुरस्कार २०२५ मधील समाजसेवक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण १४ सप्टेंबर रोजी समर्थगड मडगाव गोवा येथे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे. श्री. बुगडे हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत अल्पबचत प्रतिनिधी म्हणून काम करत असताना लहान मोठ्या सामाजिक कार्यातही ते नेहमी अग्रेसर असतात. त्यांच्या या कार्यामुळेच त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. श्री. बुगडे यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.