महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्वतःच्या फायद्यासाठी नाभिक समाजाला वेठीस धरू नये

03:04 PM Nov 09, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

दिपा शिंदे यांचा जगदीश चव्हाण यांना टोला

Advertisement

मालवण । प्रतिनिधी

Advertisement

नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण यांनी समाजाच्या पदाचा उपयोग स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी करू नये असा टोला नाभिक समाज महिला तालुकाअध्यक्ष दिपा शिंदे यांनी लगावला आहे .कालपरवा नाभिक समाजाच्या जिल्हाध्यक्षांनी कार्यकारीणीची बैठक न घेता किंवा नाभिक समाजबांधव सोडाच पण कार्यकारीणी सदस्यांनाही विश्वासात न घेता परस्पर पाठिंबा घोषीत केला आहे.मी स्वतः नाभिक समाजाची महिला तालुका प्रमुख म्हणून कार्यरत आहे,मात्र राजकारणात मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची निष्ठावान शिवसैनिकही आहे आणि महिला तालुका संघटकही आहे.मी माझे स्वतःचे वैयक्तिक मत तर वैभव नाईक यांना देणार आहेच,पण माझ्या संपर्कातील प्रत्येकाला वैभव नाईक यांनाच मत द्यायचा आग्रह करणार आहे.
समाजातील सर्व बांधवांना लोकशाहीचा अधिकार आहे आणि संपूर्ण नाभिक समाज सुशिक्षित,विचारी आणि सुज्ञ सुद्धा आहेत.त्यामुळे जगदीश चव्हाण,रूपेश पिंगुळकर यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी संपूर्ण नाभिक समाजाला वेठीस धरू नये.संपुर्ण मतदार संघातील नाभिक समाजबांधव निष्ठेचे पाईक असलेल्या वैभव नाईक यांच्याच सोबत राहील याची मला खात्री आहे असेही दीपा शिंदे म्हणाल्या आहेत.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article