For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दीपा ज्वेलर्स समभागाने दिला 25 टक्के परतावा

06:47 AM Sep 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
दीपा ज्वेलर्स समभागाने दिला 25 टक्के परतावा
Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

Advertisement

सोने व हिऱ्याचे दागिने विक्री करणारी कंपनी दीपा ज्वेलर्स यांचा समभाग मंगळवारी शेअरबाजारात दमदारपणे सुचीबद्ध झाला आहे. सदरचा आयपीओ 43 पट पेक्षा अधिक बोली मिळवू शकला आहे. आयपीओत समभागाची किमत 177 रुपये प्रति समभाग इतकी निश्चित करण्यात आली होती. या तुलनेत समभाग बीएसईवर 221 रुपये तर एनएसईवरही 221 रुपयांवर सुचीबद्ध झाला. म्हणजेच जवळपास 25 टक्क्यांचा परतावा गुंतवणूकदारांना प्राप्त करता आला. पण नंतरच्या सत्रात समभाग खाली आला. या समभागाने दिवसात 222 रुपयांची उच्चांकी व नंतर 193 रुपयांची नीचांकी गाठली होती.

कंपनी आयपीओतून 460 कोटी रुपये उभारणार आहे. 1 ते 3 सप्टेंबर अवधीत आयपीओ गुंतवणूकीसाठी खुला होता. सदरचा आयपीओ एकंदर 43 पट सबस्क्राइब झाला होता. यात पात्रताधारक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 36 पट, बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 109 पट आणि रिटेल गुंतवणूकदारांनी 19 पट सबस्क्राइब केला. आयपीओअंतर्गत 250 कोटी रुपयांचे नवे ताजे समभाग सादर करण्यात आले आहेत. याशिवाय 2 रुपये फेसव्हॅल्यूचे 1,18,48,340 समभाग ऑफर फॉर सेलअंतर्गत विक्री झाले आहेत. ऑफर फॉर सेलअंतर्गतचे प्राप्त पैसे हे समभाग विक्री करणाऱ्या समभागधारकांना मिळतील. 215 कोटी रुपये कामकाजी भांडवलासाठी खर्च केले जाणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.