ज्यादा मुद्रांक कर भरावा लागणाऱ्या दस्त नोंदणी धारकांनी शासनाच्या अभय योजनेचा लाभ घ्यावा : दुय्यम निबंधकांचे आवाहन
राधानगरी प्रतिनिधी
सन १९८० ते २००० पर्यंत दस्तऐवज नोंदणी केलेल्या नोंदणी धारकांना भराव्या लागणाऱ्या ज्यादा नोंदणी कराच्या रक्कमेत सवलत मिळावी यासाठी शासनाने सुरु केलेल्या मुद्रांक शुल्क विभागाच्या "मुद्रांक शुल्क अभय योजनेचा लाभ राधानगरी तालुक्यातील दस्त नोंदणी धारकांनी घ्यावा असे आवाहन तालुक्याचे दुय्यम निबंधक दिग्विजय आसवले यांनी केले आहे.
महसूल व वन विभागाने काढलेल्या ७ डिसेंबर २०२३ च्या आदेशान्वये शासनाच्या या "अभय" योजनेंतर्गत सन १९८० ते २००० अखेर दस्त नोंदणी केलेल्या तालुक्यातील दस्त धारकांना एक रुपयापासून ते एक लाख मुद्रांक कर भारावा लागणाऱ्या जवळपास २८ दस्त नोंदणी धारकांना भरवा लागणारा कर शंभर टक्के माफ होणार आहे तर याच काळातील दस्त धारकांना एक लाखापेक्षा जास्त कर भरावा लागणाऱ्या जवळपास २९ नोंदणी धारकांना ५० टक्के कर सवलत मिळणार आहे.
तसेय जानेवारी २००१ ते ३१ डिसेंबर २०२० अखेर नोंदणी केलेल्या दस्त नोंदणी धारकांना एक रुपया ते २५ कोटी मुद्रांक शुल्क भराव्या लागणाऱ्या धारकांना २५ टक्के कर माफ होणार असून ७५ टक्के भरवा लागणार आहे तर यात लागू असलेला दंडाच्या रक्कमेत पहिल्या टप्यात '९० टक्के सवलत मिळणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात २० टक्के सवलत मिळणार असून ८० टक्के कर भरवा लागणार आहे.
या योजनेचा पहिला टप्पा १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ तर दुसरा टप्पा १ फेब्रवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ अखेर आहे ही योजना नोंदणीकृत व अनोंदणीकृत दस्तऐवजासाठी लागू आहे दस्त नोंदणी केलेल्या तालुक्यातील एकूण ५० नोंदणी धारकांना जिल्हा मुद्रांक कार्यालयाकडून नोटीस काढण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे तरी तालुक्यातील यात समाविष्टअसलेल्या दस्तनोंदणी धारकांनी शासनाच्या यामहत्वपूर्ण "अभय योजनेचा" या योजना काळात लाभ घ्यावा असे आवाहन दुय्यम निबंधक दिग्विजय आसवले यांनी केले आहे