For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाढत्या उन्हाने दूध उत्पादनात घट

10:20 AM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
वाढत्या उन्हाने दूध उत्पादनात घट
Advertisement

जनावरांच्या आरोग्यावर परिणाम : पशुपालकांचे अर्थकारण विस्कळीत

Advertisement

बेळगाव : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यामुळे मनुष्याबरोबर जनावरांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होऊ लागला आहे. विशेषत: वाढत्या उन्हाने जनावरांच्या दूध क्षमतेत मोठी घट झाली आहे. त्यामुळे पशुपालकांचे अर्थकारण बिघडले आहे. पारा 38 अंशाच्या पुढे गेला आहे. त्यामुळे जनावरांच्या आरोग्याबरोबर दूध क्षमतेवरही परिणाम होऊ लागला आहे. जिल्ह्यात 13 लाख मोठ्या जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये 7 लाख जनावरे दुभती आहेत. त्यामुळे दैनंदिन लाखो लीटर दुधाचे उत्पादन होत आहे. मात्र मागील काही ठिकाणांपासून वाढत जाणऱ्या उन्हाचा परिणाम दूध क्षमतेवर झाला आहे. विशेषत: पावसाअभावी ओल्या व सुक्या चाऱ्याची कमतरता भासू लागला आहे. त्यातच वाढत्या उन्हामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनू लागली आहे.

जिल्ह्यात दुभत्या गायी, म्हशींची संख्या अधिक आहे. मात्र काही भागात चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर काही भागात पाणीटंचाई गंभीर बनू लागली आहे. त्यातच दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढत असल्याने जनावरांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. दरम्यान, पशुसंगोपन खात्याने वाढत्या उन्हात जनावरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले होते. मात्र कडक उन्हामुळे जनावरांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनू लागला आहे. त्याबरोबर दुभत्या जनावरांची दूध क्षमताही कमी झाली आहे. परिणामी दुधावर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबीयांना फटका बसू लागला आहे.वाढत्या उन्हाने एकूण जिल्ह्यातील 30 टक्के दुधात घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरांना उन्हापासून बचावासाठी विविध उपाय हाती घ्यावेत. जनावरे उन्हात बाहेर चरण्यासाठी सोडू नयेत. शिवाय जनावरांच्या  गोठ्यात ग्रीननेटचा वापर करावा. किंवा जनावरांना शावर किंवा वारंवार पाण्याची फवारणी करावी, असा सल्लादेखील पशुसंगोपनने दिला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.