कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वेंगुर्ल्याच्या सातेरी मंदिरात हापूस आंब्यासह विविध फळांची सजावट

04:33 PM May 04, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-

Advertisement

वेंगुर्ल्याची ग्रामदेवता श्रीदेवी सातेरी मंदिरात वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज फळांचा राजा हापूस आंबा यापासून सजावट करण्यात आली आहे . हापूस आंब्यापासून केलेल्या सजावटीला सुमारे दीड हजार फळे वापरण्यात आली आहेत. आंबा,अननस, सफरचंद, डाळिंब, मोसंबी ही फळांची सजावट पूजा सध्या आकर्षण ठरत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले शहरात पुरातन सातेरी मंदिर आहे. सुमारे ५०० वर्षांपूर्वीचे हे मंदिर प्रशस्त आवारात आहे. ५० फूट रुंद व १५० फूट लांबीचे संपूर्ण जांभ्या दगडाने ते बनविण्यात आले आहे. या पांडवकालीन मंदिराची बांधणी वास्तुकलेचा एक सुंदर नमुना आहे. सातेरीचे मंदिर हे शहराचे वैभव आहे.श्रीदेवी सातेरी चा वर्धापन दिन हा दोन दिवस विविध कार्यक्रमाने साजरा होणार आहे. मंदिराच्या सुरुवातीपासून आंब्याच्या फळांचे तोरणे तसेच अननस, सफरचंद, केळी, मोसंबी, डाळिंब, चिकू यास अन्य विविध फळांनी संपूर्ण मंदिर परिसर व गाभारा सजविलेला आहे तर श्रीदेवी सातेरीची आंब्याच्या फळापासून पूजा सजविलेली आहे. सुवासिनी देवीची खणा नारळाने ओटी भरत आहेत त्यामुळे जिल्ह्यातून व जिल्हा बाहेरून हजारो भाविकांची गर्दी दोन दिवस पाहायला मिळेल.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # vengurla # temple # news update # konkan update # marathi news
Next Article