For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मडगाव पालिका उद्यानातील गणेशपूजा मंडपाचे सुशोभिकरण

06:47 AM Mar 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
मडगाव पालिका उद्यानातील गणेशपूजा मंडपाचे  सुशोभिकरण
Advertisement

मंत्री दिगंबर कामत यांची माहिती

Advertisement

प्रतिनिधी/ मडगाव

मडगाव पालिका उद्यानातील गणेशपूजा मंडपाचे सुशोभिकरण केले जाणार असून याठिकाणी दोन मजली इमारत उभारली जाणार नाही. सध्या जे कोणी विरोध करतात, त्यांनी अगोदर सुशोभिकरणाचा प्रस्ताव समजून घेतला पाहिजे होता. सुशोभिकरणाचा प्रस्ताव समजून न घेताच विरोध करणे अयोग्य असल्याचे मत मडगावचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी व्यक्त केले.

Advertisement

पालिका उद्यानातील गणेशपूजा मंडपाबरोबरच पालिकेच्या उद्यानाचे सुशोभिकरणाचा प्रस्ताव आहे. गणेशपूजा मंडप तसेच पालिका उद्यानाला नवा साज चढविला जाणार आहे. हे काम गोवा राज्य पायाभूत साधनसुविधा विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे कामत यांनी सांगितले.

विद्यमान गणेश मंडपाच्या सुशोभिकरण प्रस्तावात गणपती स्थापनेसाठी जागा, गणेश चतुर्थीनंतर स्थानिक कलेला प्रोत्साहन देण्यासाठी याच जागेचा वापर कला दालन म्हणून केला जाऊ शकतो. या मंडपाचे छत अंशत: आच्छादित करून ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी मोकळा बैठक कक्ष ज्यामध्ये स्वच्छतागृहांची सुविधा देखील उपलब्ध केली जाणार आहे.

तसेच गणेशपूजा मंडपाच्या जवळ मडगाव पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी विश्राम कक्ष असेल ज्यामध्ये स्वच्छतागृहांची सुविधा असेल. तसेच कंपाऊंड भिंतीचे नूतनीकरण, बागेच्या अंतर्गत भागात फरसबंदीचे काम आणि दोन्ही बागांना जोडणी उपलब्ध करून देणे, पर्गोला व पाणी साठवण्यासाठी टाकी इत्यादी सुविधा उपलब्ध केल्या जाणार असल्याची माहिती कामत यांनी दिली.

Advertisement
Tags :

.