विदेशी चलन साठ्यात 10.28 अब्ज डॉलर्सची घसरण
06:15 AM Apr 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
रिझर्व्ह बँकेची माहिती : सुवर्ण साठाही घटला
Advertisement
वृत्तसंस्था/मुंबई
देशातील विदेशी चलन साठा 10.28 अब्ज डॉलर्सने कमी झाला आहे. 27 मार्चला संपलेल्या आठवड्यामध्ये भारताचा विदेशी चलन साठा 10.28 अब्ज डॉलर्सने कमी होऊन 688.058 अब्ज डॉलर्सवर घसरला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी संदर्भातली माहिती दिली आहे. या आधीच्या आठवड्यात विदेशी चलन साठा 11.413 अब्ज डॉलर्सने कमी होऊन 698.346 अब्ज डॉलर्सवर राहिला होता. पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर विदेशी चलन साठ्यामध्ये घसरण अनुभवायला मिळते आहे. याच दरम्यान रुपया देखील दबावात असलेला दिसून आला आहे. डॉलरची विक्री व इतर उपाय रिझर्व्ह बँकेने यादरम्यान अवलंबले आहेत. याच दरम्यान सुवर्ण साठ्यामध्ये 3.666 अब्ज डॉलरची घसरण झाली असून सुवर्ण साठा आता 113.521 अब्ज डॉलर्सवर राहिला आहे.
Advertisement
Advertisement