रत्नांच्या निर्यातीत घसरण
07:00 AM Nov 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई : भारताच्या रत्नांच्या निर्यातीत पाहता ऑक्टोबरमध्ये 30 टक्के इतकी घसरण दिसून आली. ऑक्टोबर महिन्यात निर्यात 2.17 अब्ज डॉलर्सची झाली होती तर आयात 19 टक्के कमतरतेसह 1.27 अब्ज डालर्सची झाली आहे. ही घसरण अमेरिका, युरोप व चीन सारख्या देशांमध्ये कमी झालेल्या मागणीसोबत, जागतिक मंद विकास व अमेरिकेकडून लादलेल्या टॅरिफमुळे अनुभवायला मिळाली. कट व पॉलिश्ड डायमंड निर्यात ऑक्टोबरमध्ये 27 टक्के घसरणीसह 1.02 अब्ज डॉलर्सची झाली. आयातीतही 35 टक्के तुट दिसून आली. आयात वाढवण्याऐवजी आधीचा स्टॉक किंवा साठा कमी करण्यावर अनेकांचा भर दिसतो आहे. रफ डायमंड आयात एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान 6.45 अब्ज डॉलर्सची राहिली. पॉलीश्ड लॅब ग्रोन डायमंडची निर्यात 34 टक्के घसरणीत होती. एप्रिल ते ऑक्टोबर कालावधीत 12.95 टक्के घसरण नोंदवली गेली.
Advertisement
Advertisement