For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धातू, सरकारी बँकासह मीडियामधील विक्रीने घसरण

07:00 AM Aug 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
धातू  सरकारी बँकासह मीडियामधील विक्रीने घसरण
Advertisement

सेन्सेक्स 539 तर निफ्टी 116 अंकांनी नुकसानीत : गुरुवारच्या सत्रात नकारात्मक कामगिरी

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील गुरुवारच्या सत्रात बाजारात घसरणीचा कल दिसून आला. यामध्ये प्रमुख क्षेत्रांपैकी धातू,मीडिया आणि सरकारी बँका यांच्या निर्देशांकांमध्ये झालेल्या घसरणीचा फटका बाजाराला बसला आहे. प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 539.35 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 76,933.59 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 116.90 अंकांनी घसरुन निर्देशांक 24,090.85 वर बंद झाला आहे. गुरुवारी आशियाई बाजारपेठांमध्ये संमिश्र कल दिसून आला. कोस्पी (दक्षिण कोरिया) तेजीत, निक्केई (जपान) 0.20 टक्के नुकसानीत हँगसेंग (हाँगकाँग) 0.34टक्के घसरणीत होता. 26 ऑगस्ट रोजी, अमेरिकन बाजारपेठांमध्ये घसरण झाली.

Advertisement

देशांतर्गत गुंतवणूकदारांनी शेअर्स खरेदी केले

मागील 7 दिवस, मागील 30 दिवस गुंतवणूकदारांनी 11,273 कोटींचे शेअर्स खरेदी केले आहेत.

ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशनचा आयपीओ आज

ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन्स लिमिटेडचा आयपीओ उद्या, 28 ऑगस्ट रोजी खुला होईल. कंपनीला यातून 720 कोटी रुपये उभे करायचे आहेत. कंपनीने आयपीओसाठी शेअर प्राईस बँड 408 रुपये ते 429 रुपये निश्चित केली आहे. गुंतवणूकदार किमान लॉट म्हणजेच 34 शेअर्ससाठी 14,586 रुपयांपासून बोली लावू शकतील. हा आयपीओ 1 सप्टेंबर रोजी बंद होईल.

पुन्हा एकदा ‘मंदी“चे वर्चस्व?

सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी केवळ 6 शेअर्समध्ये वाढ दिसून आली, तर उर्वरित 24 शेअर्स घसरणीसह बंद झाले. यापैकी, एचडीएफसी बँकेत 2.08 टक्क्यांची सर्वाधिक घसरण नोंदवली गेली. तो 712 अंकांवर घसरून बंद झाला. तज्ञांच्या मते, पश्चिम आशियातील सध्याचा तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील चढउतारामुळे देशांतर्गत शेअर बाजार अनिश्चित वातावरणात आहे. सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाली. क्षेत्रनिहाय बोलायचे झाल्यास, एफएमसीजी, ऑटो, पीएसयू बँक, मेटल आणि इतर क्षेत्रांमध्ये घसरण झाली आहे. त्याचवेळी, फार्मा क्षेत्र आणि ग्राहक टिकाऊ वस्तू क्षेत्राच्या शेअर्समध्ये सुमारे एक टक्क्याची वाढ नोंदवली गेली.

  • कोटक महिंद्रा 423
  • आयसीआयसीआय 1444
  • टेक महिंद्रा 1585
  • भारत इले. 409
  • अदानी पोर्ट 1705
  • आयशर मोर्ट्स 8101
  • सिप्ला 1419
  • बीपीसीएल 319
  • डिव्हीस लॅब 9050
  • मॅरिको 837
  • इन्फो एज 1327
  • जेएसडब्ल्यू स्टील 1338
  • अपोलो हॉस्पिटल 8805

  • एचडीएफसी बँक 712
  • एनटीपीसी 328
  • महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 3338
  • भारती एअरटेल 1878
  • एचसीएल टेक 1282
  • आयटीसी 267
  • इन्फोसिस 1106
  • इंटरग्लोब 5175
  • ट्रेन्ट 2875
  • हिंदुस्थान युनि 2007
  • टाटा स्टील 186
  • रिलायन्स इंडस्ट्रीज 1286
  • बजाज फायनान्स 1077
  • इटर्नल 324
  • स्टेट बँक 1044
  • टीसीएस 2252
  • मारुती सुझुकी 13428
  • पॉवरग्रिड कॉर्प 264
  • बजाज फिनसर्व्ह 2002
  • अॅक्सिस बँक 1250
  • अल्ट्राटेक सिमेंट 11717
  • लार्सन अॅण्ड टुब्रो 4033
  • सनफार्मा 1900
  • टायटन 5105
  • हिंडाल्को 1024
  • बँक ऑफ बडोदा 236
  • श्री सिमेंट 24450
Advertisement
Tags :

.