For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नैसर्गिक आपत्ती जाहीर करून भरपाई द्या

10:57 AM Aug 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
नैसर्गिक आपत्ती जाहीर करून भरपाई द्या
Advertisement

भारतीय कृषक समाजाची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

Advertisement

बेळगाव : राज्यात यंदा मान्सून पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांची पिके जमिनीपासून वर येण्यापूर्वीची वाया गेली असून त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. शेकऱ्यांनी कष्ट करून पिके घेतली होती. पण पावसामुळे तर नुकसान झालेच. शिवाय बियांणे व खतांच्या टंचाईमुळे अपक्षेप्रमाणे पिके घेता आली नाहीत. यामुळेही शेतकऱ्यांना समस्या निर्माण झाल्या आहेत. यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती जाहीर करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी भारतीय कृषक समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

राज्यात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून पेरणीची कामे हाती घेतली होती. पण जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिके वर येण्याआधीच वाया गेली. मात्र शेतकऱ्यांनी न खचता दुबारी पेरणीची कामे हाती घेतली. पण वेळेवर बियांसह कृत्रिम खतांचा पुरवठा वेळेवर झाला नाही. यामुळे अपेक्षित पिके हाती न लागल्याने संकटात आणखी भर पडली. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक टंचाईचा दुहेरी सामना करावा लागला. त्यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती जाहीर करून एनडीआरएफ व एसडीआरएफ आणि विमा अंतर्गत शेतकऱ्यांना भरपाई द्यावी.

Advertisement

निकृष्ट दर्जाच्या सोयाबिन बियाणांचा पुरवठा

चालू हंगामात शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाची सोयाबिन बियाणे पुरवण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागले. निकृष्ट दर्जाच्या बियाणांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकावे. जिल्ह्यात सोयाबिन, मूग व उडीद पिकांचे नुकसान झाले असून, याचा लवकरात लवकर सर्व्हे करावा. मुसळधार पावसामुळे मलप्रभा, घटप्रभा, मार्कंडेय, कृष्णा, हिरण्यकेशी नदीकाठाला महापुराचा फटका बसला. शेतजमीन, बागायत पिके व घरांचेही नुकसान झाले असून याचा सर्व्हे करावा.

गुणवत्ता चाचणी पथक स्थापन करा

जिल्हाधिकाऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेची तक्रार निवारण बैठक बोलावून विम्याच्या व्याप्तीबद्दल माहिती द्यावी. खते, किटकनाशके, बियाणे, पंपसेट, बिगर कृषी अवजारांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी गुणवत्ता चाचणी पथक स्थापन करावे. यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवारण करण्यात अडचणी येणार नसून भरपाईही वेळेत मिळण्यात मदत होणार आहे. यासाठी याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचीही मागणी करण्यात आली.

Advertisement
Tags :

.