महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मृत घोषित मिलाग्र परतला घरी

12:23 PM Jan 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पोलीस, कुटुंबियांना बसला आश्चर्याचा धक्का

Advertisement

पणजी : काही महिन्यांपूर्वी आगशी येथील एक इसम बेपत्ता झाला होता. त्यानंतर एक अज्ञात मृतदेह पोलिसांना सापडला. त्याची ओळख संबंधित कुटुंबियांनी पटविली होती. त्यानुसार तो मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देऊन त्याच्यावर दफनभूमीत अंत्यसंस्कार झाले. परंतु आता दोन महिन्यांनंतर काल बुधवारी तोच इसम पुन्हा घरी परतल्याची आश्चर्यजनक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगशीतील मिलाग्र गोन्साल्विस बेपत्ता झाल्यानंतर या संबंधीची तक्रार पोलिसात देण्यात आली होती. त्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी पणजी पोलिसांना अज्ञात मृतदेह सापडला होता. या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी संबंधित कुटुंबियांना बोलवले होते. त्यानुसार, कुटुंबियांनी तो मृतदेह मिलाग्रचा असल्याची ओळख पटविली. ओळख पटवल्यावर तो मृतदेह शवविच्छेदनासाठी बांबोळी इस्पितळात पाठवून दिला. शवविच्छेदनानंतर मृतदेह संबंधित नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांनी अंत्यसंस्कार केले. या घटनेच्या दोन महिन्यांनंतर आता मृत घोषित केलेला व्यक्ती पुन्हा घरी परतल्याने नातेवाईक व पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पणजी पोलिसांनी बांबोळी इस्पितळाला मृत घोषित केलेल्या व्यक्तीबाबत रेकॉर्डमध्येबदल करण्याची सूचना केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article