२२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा ; आमदार प्रताप सरनाईकांची मागणी
अयोध्येत २२ जानेवारीला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. त्यासाठी देशभरातून लोक अयोध्येत येणार आहेत. लोकभावना लक्षात घेता यादिवशी महाराष्ट्र सरकारने एक दिवसाची सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. ते आज विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी राम जन्मभूमी येथे होणाऱ्या भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी जगभरातून लोकं येणार आहेत. त्याचा साक्षीदार होण्यासाठी समस्त हिंदू बांधव हे आयोध्याला जाणार आहेत.या दिवसाचे साक्षीदार होण्याची अनेकांची इच्छा आहे. त्यामुळे यादिवशी सार्वजनिक सुटी जाहिर करावी यासाठी आपण, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन सादर केले आहे.वर्षामधली एखादी सार्वजनिक सुटी रद्द करून त्या जागी २२ जानेवारी या दिवशी सुट्टी जाहीर करावी. अशा पद्धतीने सुट्टी जाहीर केली तर सर्वसामान्यांनी त्याचा फायदा होईल, अशी विनंती मी केले आहे. असं सरनाईक, म्हणाले आहेत.