महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सहा लाख मोबाईल बंद करण्याचा निर्णय

06:43 AM Sep 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सायबर घोटाळे रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून कठोर कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

केंद्रीय गृहविभागाच्या सायबर नियंत्रण विभागाने सायबर घोटाळे रोखण्यासाठी कठोर कायवाई करण्याची घोषणा केली आहे. देशभरातील संशयास्पद 6 लाख मोबाईल फोन बंद केले जात असून 65 हजार युआरएलही बंद करण्यात आले आहेत. सायबर घोटाळ्या समाविष्ट असणारी 800 मोबाईल अॅप्सही बंद करण्यात आली आहेत, अशी माहिती केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आली आहे.

2023 मध्ये गृहविभागाच्या सायबर नियंत्रण कक्षाला 1 लाखाहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. संपूर्ण देशात या संदर्भात 17 हजार एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. यावर्षी आतापर्यंत 6 डिजीटल तक्रारी आल्या असून ट्रेडिंग घोटाळ्याच्या 20,043 तक्रारी मिळाल्या आहेत. तसेच गुंतवणूक घोटाळ्यांच्या संदर्भात 62,687 तर डेटिंग घोटाळ्यांच्या संदर्भात 1,725 तक्रारी सादर करण्यात आल्या आहेत. या सर्व प्रकरणांची चौकशी केली जात आहे.

अनेक कारवाया

सायबर विभागाने गेल्या चार महिन्यांमध्ये सव्वातीन लाख बँक खाती बंद केली आहेत. या खात्यांचा उपयोग घोटाळे करण्यासाठी केला जात होता. सायबर घोटाळ्यात समावेश असणाऱ्या 3,401 सोशल मिडिया, वेबसाईट आणि व्हॉटसअप ग्रुप बंद करण्यात आले आहेत. योग्य वेळी कार्यवाही केली गेल्याने 2 हजार 800 कोटी रुपयांचे घोटाळे उघडकीस आल्याने लोकांचे तेव्हढे पैसे वाचले आहेत. देशभरात 8 लाख 50 हजारांहून अधिक लोकांना सायबर घोटाळ्यांची शिकार होण्यापासून वाचविण्यात सायबर नियंत्रण विभागाला यश आले आहे.

अनेक उपाययोजना

लोकांना सायबर घोटाळ्यांपासून वाचविण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर समन्वय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. अशा घोटाळ्यांसंदर्भातील तक्रारी सुलभ पद्धतीने सादर करता याव्यात यासाठी प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. सायबर गुन्हे कसे घडतात याची बारकाईने माहिती घेऊन उपाययोजना करण्यासाठी अभ्यास कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. समाजात सायबर अपराधांसंबंधी जागरुकता निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला जात आहे.

सावधानता आवश्यक

सायबर घोटाळ्याचे बळी न बनण्यासाठी लोकांनी काही सोप्या नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही अनोळखी कॉलला किंवा संदेशाला प्रतिसाद न देणे, मोठ्या व्याजाच्या किंवा परताव्याच्या अमिषांना बळी न पडणे, शंका आल्यास व्यवहार करण्यापूर्वीच सायबर घोटाळा विरोधी कक्षाशी संपर्क करणे, आपली बँक खाती किंवा आर्थिक व्यवहार किंवा आपले पासवर्ड यांची माहिती कोणालाही न देणे, इत्यादी उपाय केल्यास अशा घोटाळ्यांपासून आपले संरक्षण होत असते. त्यामुळे हे उपाय प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article