For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्याचा निर्णय

11:27 AM Jan 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्याचा निर्णय
Advertisement

खानापूर तालुका म. ए. समिती बैठक : 17 जानेवारी रोजी सकाळी 8.30 हुतात्म्याना अभिवादन करणार

Advertisement

खानापूर : हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्याचा निर्णय खानापूर तालुक्यात म. ए. समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई होते. सुरवातीला चिटणीस आबासाहेब दळवी यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला आणि मध्यवर्ती म. ए.  समितीतर्फे महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दि. 17 रोजी हुतात्मादिनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यातून समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभावे व्हावे, असे आवाहन केले.

सीमाप्रश्नाकडे महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 17 जानेवारी रोजी कोल्हापूरमध्ये सकल मराठा समाज संघटनेतर्फे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक महिन्यात महाराष्ट्रातील एका जिह्यात आंदोलन करून 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी मुंबईत धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. मध्यवर्ती म. ए. समितीच्या या निर्णयाला पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्र सरकारने त्वरित सीमा समन्वयक मंत्र्यांची नियुक्ती करावी. सर्वोच्च न्यायालयातील खटल्याला गती द्यावी. याबाबत महाराष्ट्र सरकार व विरोधी पक्षातील नेत्यांची भेट घेऊन मध्यवर्ती समितीच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्याचे ठरविण्यात आले.

Advertisement

साहित्य संमेलनात सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीचा ठराव संमत करावा

दिल्लीत फेब्रुवारीत होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा तारा भवाळकर यांची सांगलीत भेट घेऊन साहित्य संमेलनात सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीचा ठराव संमत करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी सांगितले. बैठकीला माजी आमदार दिगंबरराव पाटील, प्रकाश चव्हाण, गोपाळ पाटील, मारुती परमेकर, संजीव पाटील, अजित पाटील, पांडुरंग सावंत उपस्थित होते. आबासाहेब दळवी यांनी प्रास्ताविक व आभार मानले. यावेळी पीएलडी बँकेच्या अध्यक्षपदी म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील यांची सलग तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल आणि जांबोटी भागातील समितीचे नेते लक्ष्मण कसर्लेकर यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल या दोघांचा तसेच सर्व संचालकांचा म. ए. समितीतर्फे सत्कार करण्यात आला.

Advertisement
Tags :

.