महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कारमध्ये एअरबॅग अनिवार्यचा निर्णय वर्षभरासाठी लांबणीवर

07:00 AM Sep 30, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पुरवठय़ातील समस्यांमुळे निर्णय : आता 1 ऑक्टोबर 2023 पासून नियम लागू होणार

Advertisement

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisement

आठपर्यंत सीट असलेल्या एम-1 श्रेणीतील कारमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने एका वर्षाने पुढे ढकलला आहे. हा निर्णय 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार होता, परंतु आता 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू केला जाणार असल्याचे परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी जाहीर केले. ऑटो उद्योग सध्या जागतिक पुरवठा साखळीशी संबंधित समस्यांना तोंड देत आहे. या समस्यांमुळे काही वस्तूंच्या पुरवठय़ात व्यत्यय येत असल्यामुळे एअरबॅग सक्तीचा निर्णय वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय रस्ते आणि महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या वषीपासूनच कारमध्ये 6 एअरबॅग देण्याच्या योजनेवर काम सुरू केले होते. यापूर्वी, मंत्रालयाने 1 जुलै 2019 पासून चालक एअरबॅग्ज आणि 1 जानेवारी 2022 पासून पुढील आसनावरील प्रवासी एअरबॅग्ज अनिवार्य केल्या होत्या. सध्या कोणत्याही कारच्या बेस व्हेरियंटमध्ये 2 एअरबॅग उपलब्ध आहेत. यात एक ड्रायव्हरसाठी आणि दुसरा समोरच्या प्रवाशांसाठी आहे. त्यानंतर आता पुढील टप्प्यात कारमधील सर्व सीट्ससाठी एअरबॅग्जची अंमलबजावणी करण्याची सूचना गडकरी यांनी वाहननिर्मिती करणाऱया कंपन्यांना केली होती.

कारची किंमत 30,000 रुपयांपर्यंत वाढणार

कारमध्ये सर्व सीट्ससाठी एअरबॅग्ज बसवल्यानंतर वाहनांची किंमत जवळपास 30 हजार रुपयांनी वाढणार आहे. एंट्री-लेव्हल मॉडेलमधील 6 एअरबॅग्ज कारची किंमत सुमारे 30,000 रुपयांनी वाढू शकतात, असे ऑटो क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. मागील सीटच्या प्रवाशांसाठी 4 एअरबॅग जोडण्यासाठी 8,000 ते 9,000 रुपये खर्च येऊ शकतो. एअरबॅगची किंमत सुमारे 1,800 रुपये आहे. त्याच वेळी, रचनेत बदल करण्यासाठी देखील पैसे खर्च केले जातील. उपकरणे आणि मजुरीचा खर्चही वाढेल, अशी माहिती देण्यात आली.

प्रवासी सुरक्षेसाठी एअरबॅग महत्त्वाची

अपघाताच्यावेळी समोरून वाहन आदळल्यास एका सेकंदापेक्षा कमी वेळेत प्रवाशाचे डोके आणि छाती सुरक्षित ठेवण्यासाठी एअरबॅग्ज महत्त्वाची भूमिका पार पाडतात. एअरबॅग शरीराला डॅशबोर्डवर आपटण्यापासून प्रतिबंधित करते. तथापि, संपूर्ण संरक्षण देण्यासाठी एअरबॅगमध्ये सीट बेल्ट लावणे आवश्यक आहे. सीट बेल्ट न लावल्यास मानेचे हाड तुटण्यासह चेहऱयाला दुखापत होण्याचीही शक्मयता बळावते. त्यामुळे कोणत्याही वाहनांतून प्रवास करणाऱया सर्व प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत कारमध्ये एअरबॅगची सक्ती करण्यात येत आहे. अशा सुरक्षितता उपाययोजनांमधून 2024 च्या अखेरीस रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण निम्मे करण्याचे रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाचे लक्ष्य आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article