For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

एससी-एसटी आरक्षणवाढीचा निर्णय रद्द

06:22 AM Oct 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
एससी एसटी आरक्षणवाढीचा निर्णय रद्द
Advertisement

उच्च न्यायालयाचा आदेश : एकूण आरक्षणाचे प्रमाण 50 टक्क्यांच्या आतच राहणार

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर :

राज्यात अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) समुदायांचा आरक्षण कोटा वाढवण्यासाठी लागू करण्यात आलेला कायदा उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. एकूण आरक्षण 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘असाधारण परिस्थिती’चे निकष निश्चित करणे योग्य किंवा व्यवहार्य नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विभू बख्रू आणि न्यायमूर्ती के. एस. हेमलेखा यांच्या पीठाने हा महत्त्वपूर्ण आदेश दिला.

Advertisement

‘कर्नाटक अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (शैक्षणिक संस्थांमधील जागांचे आणि राज्य सेवेतील नियुक्त्या किंवा पदांचे आरक्षण) कायदा-2022’ संमत करून सरकारने शैक्षणिक संस्था आणि राज्य सरकारी सेवांमध्ये अनुसूचित जातींचे आरक्षण 15 टक्क्यांवरून 17 टक्के आणि अनुसूचित जमातींचे आरक्षण 3 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राज्यातील एकूण आरक्षणाचे प्रमाण 56 टक्क्यांवर पोहोचले होते. सरकारचा हा निर्णय न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे.

या आरक्षणवाढीला आक्षेप घेत महेंद्रकुमार मिश्रा यांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेली 50 टक्क्यांची पर्यादा ओलांडली गेल्यामुळे उच्च न्यायालयाने सोमवारी राज्यातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी वाढविलेले आरक्षण घटनाबाह्dया ठरवून रद्द केले.

आरक्षणवाढ काय आहे?

यापूर्वी कर्नाटकात अनुसूचित जातींसाठी 15 टक्के आणि अनुसूचित जमातींसाठी 3 टक्के आरक्षण होते. लोकसंख्येच्या आकडेवारीवर आधारित, न्यायमूर्ती नागमोहनदास समितीने सरकारला अनुसूचित जातींचे आरक्षण 15 टक्क्यांवरून 17 टक्के आणि अनुसूचित जमातींचे आरक्षण 3 टक्क्यांवरून वरून 7 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली होती. या समितीच्या अहवालाबाबत आयोजित सर्वपक्षीय बैठकीत सर्व राजकीय पक्षांनी आरक्षण वाढवण्याच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली होती.

बसवराज बोम्माई यांच्या सरकारचा अध्यादेश

बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन भाजप सरकारने अनुसूचित जाती  आणि अनुसूचित जमाती यांचा एकत्रित आरक्षण कोटा 18 टक्क्यांवरून 24 टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी पाऊल उचलले होते. राज्य मंत्रिमंडळाने मसुदा विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर, सरकारने अध्यादेश जारी केला. त्याला राज्यपालांचीही मंजुरी मिळाली. त्यानंतर, सरकारने अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणवाढीची राजपत्रित अधिसूचना प्रसिद्ध केली. या निर्णयामुळे राज्यातील एकूण आरक्षण कोटा 50 टक्के ओलांडून 56 टक्क्यांपर्यंत वाढला होता.

Advertisement
Tags :

.