For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युरोपवर 10 टक्के कर लादण्याचा निर्णय रद्द

07:00 AM Jan 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
युरोपवर 10 टक्के कर लादण्याचा निर्णय रद्द
Advertisement

डोनाल्ड ट्रम्प यांची ग्रीनलँडसंबंधी भूमिका मवाळ

Advertisement

वृत्तसंस्था/दावोस

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडसंबंधीच्या मुद्यावरून युरोपीय देशांवर 10 टक्के अतिरिक्त कर लादण्याची धमकी मागे घेतली आहे. आपण आता ग्रीनलँड मुद्यावर डेन्मार्कसह कोणत्याही युरोपीय देशावर शुल्क लादणार नाही, असे त्यांनी गुरुवारी जाहीर केले. यापूर्वी, ट्रम्प यांनी ग्रीनलँडबाबतच्या आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर युरोपीय देशांवर आर्थिक दबाव आणण्याचा इशारा दिला होता. तथापि, आता त्यांनी आपली भूमिका मवाळ करत युरोपीय देशांवर 10 टक्के अतिरिक्त शुल्क आकारणार नसल्याचे स्पष्ट केले. ट्रम्प यांनी बुधवारी रात्री सोशल मीडियावर यासंबंधीची घोषणा केली.

Advertisement

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक मंचातील भाषणात ट्रम्प यांनी अनेक जागतिक घडामोडींवर मतप्रदर्शन केले. याप्रसंगी त्यांनी मला पूर्ण अधिकार, मालकी आणि नियंत्रणासह ग्रीनलँड हवे आहे, परंतु ते साध्य करण्यासाठी ते बळाचा वापर करणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. याचदरम्यान त्यांनी युरोपवर कर लादण्याची धमकीही तात्पुरती मागे घेतली आहे. ग्रीनलँडबाबत लष्करी कारवाई करण्यापासून मागे हटण्याचा त्यांचा हेतू त्यांनी व्यक्त केला आहे. तथापि, ग्रीनलँड ताब्यात घेण्याची त्यांची इच्छा अजूनही कायम आहे.

युरोपियन युनियन-अमेरिका व्यापार करार स्थगित

ग्रीनलँडवरील अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वारंवार केलेल्या टिप्पण्यांमुळे युरोप आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे. त्यानंतर आता ट्रम्प यांच्या दावोसमधील भाषणानंतर युरोपियन संसदेने मोठा निर्णय घेतला आहे. युरोपियन संसदेने युरोपियन युनियन आणि अमेरिकेतील प्रस्तावित व्यापार करारावरील काम तात्पुरते थांबवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांचे दावोसमधील वक्तव्य भाषणासारखे कमी आणि धमकीसारखे जास्त वाटले.

Advertisement
Tags :

.