महिलांना मोफत प्रवासासाठी स्मार्टकार्ड वितरणाचा निर्णय
10:42 AM Feb 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेंगळूर : राज्यात शक्ती योजनेंतर्गत महिलांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे. तथापि काही ठिकाणी राज्याबाहेरील महिला आधार कार्ड दाखवून या योजनेचा गैरवापर करत असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर शक्ती योजनेचा गैरवापर रोखण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. केएसआरटीसी बसमध्ये महिलांना मोफत प्रवास करण्यासाठी स्मार्ट कार्ड वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्त्वाखाली गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कायदा मंत्री एच. के. पाटील यांनी माहिती दिली.
Advertisement
Advertisement