सिंधुदुर्गातील ४ रुग्णालयात रिक्तपदे व डॉक्टर निवासचा प्रश्न सोडविणार
दीपक केसरकर ; विधान भवन नागपूर येथे आरोग्य मंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत निर्णय
नागपूर/भरत सातोस्कर
वेंगुर्ला, दोडामार्ग, सावंतवाडी व शिरोडा या चारही रुग्णालयात मेडिकल सुप्रीटेंडेंट देण्याचा या बैठकीत निर्णय झाला आहे. तसेच काही हॉस्पिटलमध्ये टेक्निशियन व स्पेशालिटी डॉक्टर नाहीत ते सुद्धा देण्याची व्यवस्था केली आहे. डॉक्टरची निवासस्थाने सुद्धा नवीन बांधून देण्यात येणार आहेत. अशी विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
नागपूर येथील विधान भवनात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला व शिरोडा या चारही उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील समस्या संदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचेशी केलेल्या चर्चेनुसार आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या दालनात आरोग्य खात्याचे वरीष्ठ अधिकाऱ्यासमवेत बैठक झाली.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या या बैठकीत तिन्ही तालुक्यातील उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयातील रिक्तपद भरण्यासाठी प्रामुख्याने चर्चा झाली. विशेष तज्ञांची पद देखील भरली जाणार आहेत. तर सावंतवाडीतील भुलतज्ञांचे थकीत मानधन अदा केल जाणार आहे. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच मानधन देखील डिसेंबर दोन महिन्यात काढलं जाणार आहे. डॉक्टरांना क्वार्टर्स बांधून देण्यासाठीची चर्चा देखील या बैठकीत झाली. तर वेंगुर्ला, दोडामार्गात शवविच्छेदन गृहासाठी प्रस्ताव करण्याची सुचना केली. तिन्ही तालुक्यातील रूग्णालयातील समस्या कायमस्वरूपी दुर करण्यासाठी या बैठकीत चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.