महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कविताच्या जामीन अर्जावर 8 एप्रिलला निर्णय होणार

07:00 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी आणि भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्या के. कविताच्या जामीन याचिकेवर दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी निर्णय राखून ठेवला आहे. 8 एप्रिल रोजी न्यायालय आपला निकाल देणार आहे. दिल्ली मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने कविता यांना 15 मार्च रोजी अटक केली होती. यानंतर त्या 23 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत होत्या. 26 मार्च रोजी दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाने त्यांना 9 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्यापासून त्या तिहार तुऊंगात आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article