For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

'लाडक्या बहिणीं'चा डीसेंबरचा हफ्ता आजपासून होणार जमा

11:49 AM Dec 24, 2024 IST | Pooja Marathe
 लाडक्या बहिणीं चा डीसेंबरचा हफ्ता आजपासून होणार जमा
December Installment for 'Ladaki Bahin' to Be Credited Today
Advertisement

मुंबई

Advertisement

'लाडकी बहीण योजने'चा डिसेंबरचा हफ्ता ट्रान्सफर केला असून लवकरच योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी अधिवेशनात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चा हफ्ता लवकरच वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. डिसेंबरचा हफ्ता वर्ग करण्याचे काम आजपासून सुरू होणार असल्याचेही सांगितले.

विधानसभा निवडणूकी दरम्यान लाडकी बहीण योजनेता हफ्ता १५०० वरून २१०० होणार असल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान या योजनेचा ६ वा हफ्ता हा १५०० रुपयांचाच जमा होणार असल्याचे सांगण्यात आले. जुलै ते नोव्हेंबरपर्यंत १५०० रुपयांप्रमाणे ७५०० रुपये योजनेतील लाभार्थी महिल्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले.

Advertisement

पहिल्या टप्प्यात २ कोटी ३५ लाख महिलांना १५०० रुपयांप्रमाणे पैसे जमा करण्यात आले आहेत. तर निवडणुकीआधी आलेल्या २५ लाख नवीन अर्जाटी स्क्रुटीनी सूरू आहे, ती पूर्ण झाल्यानंतर या महिलांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात येतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Advertisement
Tags :

.