For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केरळमधील स्फोटातील बळींची संख्या 6 वर

06:16 AM Nov 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
केरळमधील स्फोटातील  बळींची संख्या 6 वर
Advertisement

कोची :

Advertisement

केरळच्या एर्नाकुलम येथे 29 ऑक्टोबर रोजी ख्रिश्चन समुदायाच्या प्रार्थनासभेत झालेल्या स्फोटातील बळींची संख्या वाढून 6 झाली आहे. स्फोटाच्या दिवशी 2 जणांचा मृत्यू झाला होता तर 50 जण जखमी झाले होते. यानंतर 30 ऑक्टोबर, 6 नोव्हेंबर, 11 नोव्हेंबर आणि 16 नोव्हेंबर रोजी प्रत्येकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या स्फोटाप्रकरणी आरोपी डोमिनिक मार्टिनला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपी मार्टिनला 29 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी याप्रकरणी 54 गुन्हे नोंदविले आहेत. सर्वाधिक 26 गुन्हे मलप्पुरम जिल्ह्यात नोंद झाले आहेत. तर एर्नाकुलममध्ये 15 आणि तिरुअनंतपुरममध्ये पाच गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. स्फोटाच्या दुसऱ्याच दिवशी आरोपी मार्टिनने पोलीस स्थानकात जात आत्मसमर्पण केले होते. पोलिसांच्या चौकशीत मार्टिनने अनेक खुलासे केले होते. सोशल मीडियावरून बॉम्ब निर्मिती शिकलो. तर थमन्नन येथे ज्या भाड्याच्या घरात राहत होतो, त्या घराच्या छतावर बॉम्बचे परीक्षण केल्याचे त्याने सांगितले आहे.

कोचीबाहेरील अलूवा येथील स्वत:च्या घरात त्याने बॉम्ब तयार केला होता. डोमिनिकने आत्मसमर्पण करण्यापूर्वी फेसबुक लाइव्हवर स्वत:च्या गुन्ह्यांची कबुली दिली होती. ख्रिश्चन धर्मातील यहोवाच्या साक्षी समुहाशी आपण संबंधित असलो तरीही ही विचारसरणी पसंत नाही. ही विचारसरणी देशासाठी धोकादायक आहे, कारण या समुहाचे लोक देशाच्या युवांच्या मनात विषाची पेरणी करत आहेत. याचमुळे प्रार्थनासभेदरम्यान स्फोट घडवून आणल्याचे डोमिनिकने सांगितले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.