कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इराण बंदर स्फोटातील मृतांची संख्या 25 वर

06:08 AM Apr 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

800 हून अधिक जखमी

Advertisement

वृत्तसंस्था/ तेहरान

Advertisement

इराणच्या दक्षिणेकडील बंदर शाहीद राजाई येथे शनिवारी झालेल्या स्फोटानंतर लागलेल्या भीषण आगीतील मृतांची संख्या 25 वर पोहोचली आहे. तसेच 800 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हा स्फोट क्षेपणास्त्र प्रणोदक बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर या घटनेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. इराण आणि अमेरिका तेहरानच्या वेगाने विस्तारणाऱ्या अणुकार्यक्रमावर ओमानमध्ये तिसऱ्या फेरीच्या चर्चेचे आयोजन केले असतानाच हा स्फोट झाल्याने त्याबाबत अनेक शंका-कुशंका उपस्थित केल्या जात आहेत.

शाहिद राजाई बंदरातील सिना कंटेनर यार्डमध्ये शनिवारी मोठा स्फोट झाला. रात्रीपर्यंत इतर कंटेनरमध्येही स्फोट झाल्याचे वृत्त आले. स्फोटानंतर बंदरात लागलेली मोठी आग विझविण्यासाठी हेलिकॉप्टरने हवेतून पाण्याचा मारा करण्यात आला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये स्फोटापूर्वी लाल-नारिंगी धूर निघत असल्याचे दिसून येत आहे. सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी बंदरात धोकादायक आणि रासायनिक पदार्थांच्या साठवणुकीमुळे हा स्फोट झाल्याचे सांगितले. इराणचे गृहमंत्री इस्कंदर मोमेनी यांनी प्रसारमाध्यमांना मृतांच्या संख्येची माहिती देताना 25 जण दगावल्याचे सांगितले.

रसायनांमुळे क्षेपणास्त्र इंधनाचा स्फोट?

अंब्रे या खासगी सुरक्षा कंपनीच्या म्हणण्यानुसार, सोडियम परक्लोरेटचा एक कंटेनर मार्च 2025 मध्ये बंदरावर आला होता. क्षेपणास्त्रांसाठी घन इंधन बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. हे रसायन चीनमधून दोन जहाजांद्वारे इराणमध्ये आणण्यात आले होते. क्षेपणास्त्रांसाठी घन इंधनाच्या मालाची चुकीची हाताळणी केल्यामुळे ही आग लागली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या स्फोटानंतर इराणवरच अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article