For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जपानमधील भूकंपात मृतांची संख्या 25 वर

07:00 AM Jul 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
जपानमधील भूकंपात मृतांची संख्या 25 वर
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

जपानच्या कुमामोतो प्रदेशात झालेल्या शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 25 झाली आहे. खंडित वीजपुरवठा आणि वाहतूक व्यवस्थेचे नुकसान यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. नुकसानीचा आढावा सुरू आहे. क्यूशू शिंकांसेन बुलेट ट्रेन आणि काही विमानतळांवरील सेवा अद्याप बंद आहेत. लष्कर आणि आपत्कालीन दल बचावकार्यात गुंतले आहेत. बाधित भागांमध्ये बचावकार्य सुरू असल्याचे पंतप्रधान सनाए ताकाइची यांनी सांगितले. या आपत्तीमध्ये 36,900 हून अधिक घरांचा वीजपुरवठा खंडित झाला असून काही भागांमध्ये दळणवळण यंत्रणा ठप्प झाली आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी जपानच्या कुमामोतो प्रदेशात झालेल्या शक्तिशाली भूकंपाबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच यांनी तेथील जनता आणि सरकारसोबत भारताचा पाठिंबा आणि एकजूट व्यक्त केली.

Advertisement
Advertisement
Tags :

.