For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी

06:07 AM Jun 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीमुळे दिल्ली पोलीस सतर्क झाले असून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. गुरुवारी मध्यरात्री एका व्यक्तीने गाझियाबाद पीसीआरला फोन करून मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर एकच खळबळ उडाली. रात्रीच्या सुमारास फोन आल्यानंतर मुख्यमंत्र्यांना रात्रीच याची माहिती देण्यात आली. गाझियाबाद पोलिसांनी याबाबत उत्तर पश्चिम जिल्हा पोलिसांना माहिती दिली. सध्या गाझियाबाद आणि दिल्ली पोलीस फोन करणाऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.