For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नराधम भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा

02:36 AM Jun 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
नराधम भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा
Advertisement

नसरापूर हत्याप्रकरण  : पुणे विशेष न्यायालयाचा निकाल

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

पुणे

Advertisement

नसरापूर येथे साडेतीन वर्षाच्या मुलीवरील अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या नराधम भीमराव कांबळे याला न्यायालयाने सोमवारी फाशीची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा निकाल दिला. या प्रकरणाचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया वेगाने पूर्ण झाल्याने हा खटला अल्पावधीतच म्हणजे गुन्हा घडल्यापासून केवळ दोन महिन्यांतच निकाली निघाला. एकूण 137 पानांचा हा निकाल आहे.

नराधम कांबळे याला विशेष न्यायालयाने गुऊवारी दोषी ठरविले होते. त्याला मृत्युदंड की जन्मठेपेची शिक्षा होणार, याचा निकाल सोमवारी लागणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार न्यायालयाने निकाल दिला. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत आरोपीला अटक केली होती. तपासादरम्यान घटनास्थळावरील पुरावे, तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही चित्रफिती, साक्षीदारांचे जबाब आणि वैद्यकीय अहवाल यांच्या आधारे आरोपीविऊद्ध भक्कम पुरावे गोळा करण्यात आले होते. पोलिसांनी अल्पावधीत दोषारोपपत्र दाखल करून खटल्याची सुनावणी सुरू केली होती.

सरकारी पक्षाने न्यायालयात आरोपीविऊद्ध परिस्थितीजन्य तसेच न्याय वैद्यकीय पुराव्यांची साखळी सादर केली. आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचे न्यायालयासमोर सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला यश आले. या गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर आणि समाजमन हेलावून टाकणारे असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने हा गुन्हा दुर्मीळातील दुर्मीळ स्वरूपाचा असल्याचा युक्तिवाद केला होता. तसेच आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणीही करण्यात आली होती. बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली.

 फाशी होईल, त्याच दिवशी खरा न्याय :आईची प्रतिक्रिया

निकाल जाहीर होताच न्यायालय परिसरात मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. मुलीच्या कुटुंबीयांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत न्यायव्यवस्थेने आपल्या मुलीला न्याय दिल्याची भावना व्यक्त केली. गुन्हेगाराला झालेली शिक्षा योग्यच आहे. परंतु, ज्यादिवशी या नराधमाला फाशी होईल, त्याच दिवशी आमच्या लेकीला खरा न्याय मिळाला, असे आम्ही समजू, अशी प्रतिक्रिया पीडित मुलीच्या आईने दिली.

 16 दिवसांतच साक्षी व पुरावे नोंदविले 

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी त्वरित दोषारोपपत्र दाखल करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार केवळ 15 दिवसांत दोषारोपपत्र सादर केले. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अंतिम युक्तिवादादरम्यान अॅड. मिसर आणि त्यांचे सहकारी अॅड. प्रथमेश शिंगणे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यांचा संदर्भ देत युक्तिवाद केला. या खटल्यात 16 दिवसांतच साक्षी व पुरावे नोंदविण्यात आले असून, 20 दिवसांत अंतिम युक्तिवाद पूर्ण करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांनी केला आहे.

 55 साक्षीदारांची साक्ष नोंदवली 

नसरापूर हत्याप्रकरणात सरकारी पक्षाने मुलीचे कुटुंबीय, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच, तपास अधिकारी, न्यायवैद्यकीय तज्ञ आणि डीएनए विश्लेषक यांच्यासह 50 हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवली. विशेष न्यायालयाने 21 मेपासून या प्रकरणाची दैनंदिन सुनावणी सुरू केली. खटल्याची सुनावणी ‘इन-पॅमेरा’ पद्धतीने झाली. सुनावणीदरम्यान सीसीटीव्ही चित्रिकरण, डीएनए अहवाल, शवविच्छेदन अहवाल आणि इतर न्याय वैद्यकीय पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले.

 हे ठरले महत्त्वाचे पुरावे :

- गुन्ह्यापूर्वी आरोपीने घटनास्थळ व परिसरातील घरांची केलेली रेकी

- मुख्य साक्षीदार आणि बालसाक्षीदार यांनी दिलेले जबाब

- घटनास्थळ पंचनामे, आरोपीची ओळख परेड, जप्त मुद्देमाल

- न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेच्या विश्लेषण अहवालांतून गुन्ह्याची साखळी सिद्ध झाली

- तपासातील ‘चेन ऑफ कस्टडी’ अखंड असल्याने पुराव्यांमध्ये कोणतीही छेडछाड झालेली नसल्याचेही स्पष्ट झाले

- सीसीटीव्ही चित्रिकरण

- न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे अहवाल

- वैद्यकीय पुरावे

 सर्वाधिक गतीने निकाल लागलेला राज्यातील पहिलाच खटला :

जलदगतीने चाललेल्या या प्रकरणाचा केवळ दोन महिन्यांत निकाल लागला आहे. अत्याचार आणि खून प्रकारात राज्याच्या न्यायव्यवस्थेच्या इतिहासात इतक्मया जलद पुरावा नोंदविल्याचा हा पहिल्याच खटला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी केवळ 16 दिवसांत दोषारोपपत्र दाखल केले होते.

दोषारोपपत्रात असलेले पुरावे :

- घटनास्थळ आणि परीसरातील सीसीटीव्ही फुटेज

- 50 हून अधिक साक्षीदारांचे जबाब

- घटनेने 50 हून अधिक फोटो

- वैद्यकीय पुरावे

- न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे अहवाल

- घटनाक्रमाचे वर्णन

- आरोपीने दिलेला जबाब

- तांत्रिक तपास व त्याचे अहवाल

 आरोपीने केलेला बचाव : 

घटनेच्या दिवशी मी घायवळांच्या शेडमध्ये गेलो, त्यावेळी तिथे मुलगी आली. तिला गाठी शेव खाण्यास दिली. तिला गोठ्यात नेताना माझा पाय घसरला. ज्यामुळे मुलीच्या डोक्मयाला मार लागला व ती रडू लागली. तिला खाटेवर झोपवले. ती ओरडत होती. लोक आरोप करतील म्हणून मी तिला तिथेच सोडून निघून गेलो व कट्ट्यावर जाऊन बसल्याचे सांगितले.

 या कलमांनुसार सुनावली शिक्षा  :

भारतीय न्याय संहितेच्या कलम 137 (2) (अपहरण), 64 व 65 (बलात्कार), 103 (खून), 74 (विनयभंग करण्याच्या उद्देशाने बळजबरी करणे), 140 (1) यांसह लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पोक्सो) कलम 4, 6, 8, 12 या कलमांनुसार दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या सर्व कलमांनुसार न्यायालयाने कांबळे याला शिक्षा सुनावली आहे.

 उच्च न्यायालयात फाशी शिक्षा निश्चित होणार

सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेनुसार ती उच्च न्यायालयात निश्चित करावी लागते. त्यानुसार आता हा निकाल उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून निश्चित केला जाणार आहे.

 न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला

मी आज समाजाचा एक भाग म्हणून नसरापूर अत्याचार प्रकरणात मृत्यू झालेल्या मुलीची माफी मागते. समाजात आनंदाने हसत खेळत असलेल्या या मुलीला समाजातील एका विकृतीने तिच्यावर क्रूर अत्याचार करून तिचा खून केला.  एवढ्यावरच न थांबता मृत्यूनंतरदेखील त्याने त्याची विकृती दाखवली. मी एक आई आणि पोलिस अधिकारी म्हणून मुलीच्या मृत्यूनंतर तिला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.

 विजयमाला पवार, पोलिस निरीक्षक आणि तपास अधिकारी

 हा संविधानाचा विजय

कायदा आणि न्यायव्यवस्था कमजोर आहे, असा समज जनमानसात आहे. त्यामुळेच आरोपी निर्दोष सुटतात, असे प्रत्येकाचे मत होते. मात्र, आज न्यायालयाने दिलेला निकाल हा कायदे आणि न्यायव्यवस्था किती मजबूत आहे हे अधोरेखित करतो. नसरापूर प्रकरणात न्यायालयाने दिलेला निकाल हा न्यायव्यवस्था आणि संविधनाचा विजय आहे.

 अॅड विपुल दुशिंग, मूळ फिर्यादी यांचे वकील

 न्यायालयाने निकालात नमूद केलेले निरीक्षणे :

- गुन्ह्याचा प्रकार विचारता घेता हा दुर्मीळ गुन्हा आहे.

- पोलिसांनी खूप चांगला तपास केला आहे, ते अभिनंदनास पात्र आहे

- सरकार पक्ष आणि बचाव पक्ष यांच्या सहकार्यामुळे 11 ते 5 या वेळेत काम करून 16 दिवसांत जबाब आणि साक्षी पुरावे तपासता आले

- तपास यंत्रणेने पुरावे नष्ट होण्यासाठी ते जमा केले

- वेळेत न्याय मिळाला नाही की लोक पर्याय शोधतात

- या निकालाच्या माध्यमातून लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढेल

 नसरापूर अत्याचार प्रकरणाचा घटनाक्रम :

1 मे  - नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून खून

1 मे - सीसीटीव्ही फुटेजच्या आधरे संशयित भीमराव कांबळे याला ताब्यात घेण्यात आले

3मे - नसरापूर अत्याचार प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक

4 मे - घटनेच्या निषेधत नसरापूर, भोर आणि परिसरात बंद व आंदोलने

7 मे - आरोपीला घटनास्थळी नेऊन गुन्ह्याची पुनर्रचना

10 मे - नसरापूर येथे चिमुकलीवरील अत्याचाराच्या निषेधर्थ पुण्यात मूक मोर्चा

14 मे - आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

16 मे - अवघ्या ?? दिवसांत दोषारोपपत्र दाखल

28 मे - विशेष न्यायालयाने आरोपीविऊ× आरोपनिश्चित केले

29  मे - जलदगती खटल्यास इन-पॅमेरा सुऊवात

30 मे - मुलीच्या पालकांसह पहिल्या महत्त्वाच्या साक्षीदारा?च्या साक्षी सुरू

2 जून - प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मुलांची साक्ष नोंदवणी

3 जून - आरोपीने गुन्ह्याची न्यायबाह्य कबुली दिल्याची माहिती न्यायालयात सादर

6 जून - न्यायवैद्यक तज्%ाा?ची साक्ष पूर्ण

13 जून - 53 साक्षीदारांची साक्ष पूर्ण; सीसीटीव्ही पुराव्याची न्यायवैद्यकीय तज्ञांकडून पुष्टी

17 जून - सरकारी पक्षाने पुरावे सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण केली; एकूण 55 साक्षीदारांची साक्ष नोंद

20 जून - दोन्ही बाजूंचे अंतिम युक्तिवाद पूर्ण; निकाल राखीव

25 जून - विशेष न्यायालयाने कांबळेलादोषी ठरवले

29 जून - न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली

Advertisement

.