मृत्यूची भविष्यवाणी करणारे अॅप
डाउनलोड करताच सुरू होतो डेथ क्लॉक
जग आता पूर्वीपेक्षा खूपच बदलले आहे. पूर्वी जेथे अनेक गोष्टींसाठी आपण इतरांवर अवलंबून होतो, तर आता या सर्व गोष्टी यंत्र आणि अॅप्लिकेशन्समुळे होत आहेत. आता कुंडली तयार करणे आणि भविष्यात काय घडणार हे देखील सॉफ्टवेअर आणि अॅप्लिकेशनद्वारे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात सर्वात महत्त्वाची भूमिका आर्टिफिशियल इंटेलिजेन्स बजावत आहे. भविष्य सांगणारे ज्योतिषीच जीवन अन् आयुष्याबद्दल अनुमान व्यक्त करायचे. परंतु आता आर्टिफिशियल इंटेलिजेन्सद्वारे देखील लोक मृत्यूची अचूक भविष्यवाणी जाणून घेत आहेत. लाखो लोक या अॅपचा वापर देखील करत आहेत. हे अॅप डाउनलोड होताच तुमच्या आयुष्यातील किती दिवस शिल्लक आहेत हे सांगते.
डेथ क्लॉक असे अॅप जे लोकांना त्यांच्या मृत्यूच्या तारखेबद्दल सांगते. हा अॅप 2006 साली तयार करण्यात आला होता. यात नोंदणी केल्यावर संबंधिताला काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात, त्यानुसार आर्टिफिशियल इंटेलिजेन्स संबंधिताचा वर्तमान आणि भविष्याबद्दल अनुमान व्यक्त करते. यात स्वत:चे नाव, लिंग आणि काही सामान्य प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. अॅपमध्ये कुटुंबीयांची शारीरिक आणि मानसिक स्थितीची माहिती द्यावे लागते. हे सर्वकाही जाणल्यावर अॅप युजरच्या मृत्यूची तारीख नमूद करते आणि संबंधिताचे डेथ क्लॉक त्याच दिवसापासून सुरु होते. अॅपवर साइन इन करण्यासाठी संबंधिताला 3331 रुपये खर्च करावे लागतात. एआय सुमारे 1200 एक्सपेक्टैंन्सी लाइफ स्टडीज वाचल्यावर मृत्यूची तारीख सांगते, अशा स्थितीत त्याचा अनुमान अत्यंत अचूक असतो असा दावा याचे डेव्हलपर ब्रेट फ्रँसन यांनी केला आहे. हा अॅप आतापर्यंत 1,25,000 वेळा डाउनलोड करण्यात आला असून यावर साइन इन करण्यासाठी युजर किमान 12 वर्षाचा असणे आवश्यक आहे.