कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू

12:24 PM Oct 04, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

न्हावेली /वार्ताहर

Advertisement

मळगाव- कुंभार्ली येथे एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सांबराचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास झाराप-पत्रादेवी महामार्गावर, चॉकलेट फॅक्टरीसमोर घडली.​ग्रामस्थांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सांबराचा मृत्यू धडकेने झाल्याचे सांगितले. रात्री उशिरा पंचनामा करण्यात आला आणि मृत सांबरावर अंत्यसंस्कार करण्यात आले.​यावेळी वनविभागाचे कर्मचारी विजय पांचाळ, मोहन बोंटुकडे, प्रवीण कमळकर आणि जलद कृती दलाचे कर्मचारी यांनी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update# accident # dead deer #
Next Article