अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू
12:24 PM Oct 04, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
न्हावेली /वार्ताहर
Advertisement
मळगाव- कुंभार्ली येथे एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सांबराचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास झाराप-पत्रादेवी महामार्गावर, चॉकलेट फॅक्टरीसमोर घडली.ग्रामस्थांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सांबराचा मृत्यू धडकेने झाल्याचे सांगितले. रात्री उशिरा पंचनामा करण्यात आला आणि मृत सांबरावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी वनविभागाचे कर्मचारी विजय पांचाळ, मोहन बोंटुकडे, प्रवीण कमळकर आणि जलद कृती दलाचे कर्मचारी यांनी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली.
Advertisement
Advertisement