महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राम मंदिराच्या सुरक्षेत तैनात जवानाचा मृत्यू

06:22 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गोळी लागून मृत्यू झाल्याने खळबळ

Advertisement

वृत्तसंस्था/ अयोध्या

Advertisement

अयोध्येतील राम मंदिराच्या सुरक्षेकरता तैनात विशेष सुरक्षा दलाच्या एका जवानाचा संशयास्पद स्थितीत गोळी लागून मृत्यू झाला आहे. जवानाला गोळी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मंदिर परिसरात धाव घेतली आहे.

जवानाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवियणत आला आहे. मृत जवान हा आंबेडकर नगरचा रहिवासी होती. बुधवारी पहाटे अचानक गोळी झाडल्याचा आवाज ऐकू आल्यावर रामजन्मभूमी परिसरात खळबळ उडाली. संबंधित जवानाचे नाव शत्रुघ्न विश्वकर्मा होते आणि तो 25 वर्षांच होता. गोळीबाराचा आवाज ऐकू आल्यावर त्याच्या सहकाऱ्यांनी धाव घेतली असता शत्रुघ्न रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तेथे डॉक्टरांकडून त्याला मृत घोषित करण्यात आले.

जवानाच्या मृत्यूनंतर फॉरेन्सिक टीमने तेथे तपासणी केली आहे. तर संबंधित जवान काही दिवसांपासून त्रस्त होता आणि घटनेपूर्वी तो मोबाइल हाताळत होता अशी प्रारंभिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी जवानाचा मोबाइल तपासणीसाठी पाठविला आहे.

 

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article