For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बछड्यांचा मृत्यू, रेल्वे जप्त करण्याची तयारी

06:29 AM Aug 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
बछड्यांचा मृत्यू  रेल्वे जप्त करण्याची तयारी
Advertisement

मध्यप्रदेश वन विभागाकडून विचार

Advertisement

वृत्तसंस्था/ भोपाळ

मध्यप्रदेश वन विभाग एका रेल्वेगाडीला जप्त करण्याचा विचार करत आहे. या रेल्वेच्या धडकेमुळे मिडघाटक-बुधनी रेल्वेमार्गावर वाघाच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाला होता. रातापानी वन्यजीव अभयारण्यातून जाणाऱ्या या रेल्वेची धडक बसल्याने एका बछड्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता, तर उर्वरित दोन बछड्यांनी उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला होता.

Advertisement

टायगर स्टेट मध्यप्रदेशात वन अधिकारी निर्णायक कारवाईसाठी उच्च अधिकाऱ्यांकडे आग्रह धरत आहेत. यासाठी आसाम सरकारच्या निर्णयाचे उदाहरण दिले जात आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये हत्ती आणि त्याच्या पिल्लाच्या मृत्यूप्रकरणी एक रेल्वेइंजिनच जप्त करण्याचा निर्णय आसाम सरकारने घेतला होता.

तीन बछड्यांच्या मृत्यूमुळे मध्यप्रदेशच्या वन अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. ही घटना पूर्णपणे टाळता आली असती असे त्यांचे मानण आहे. तिन्ही बछडे 14 जुलै रोजी रात्री रेल्वेमार्गावर आले होते.  ज्या रेल्वेइंजिनची धडक बसल्याने या बछड्यांचा मृत्यू झाला, ते जप्त करण्यात यावे असे वन विभागाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. आसाम वन विभाग एक हत्ती आणि त्याच्या पिल्लाच्या मृत्यूसाठी इंजिन जप्त करू शकतो, तर आम्ही आमच्या बछड्यांसाठी असे का करू शकत नाही असे प्रश्नार्थक विधान त्याने केले आहे.

रेल्वेमार्ग जंगलातून जातात आणि ही नेहमीच वनभूमी राहणार आहे. उपाययोजना करणे आणि तिसऱ्या रेल्वेमार्गासाठी पर्यावरण मंजुरीदरम्यान लादण्यात आलेल्या अटींचे पालन करणहे रेल्वेची जबाबदारी असल्याचे एका वन अधिकाऱ्याने म्हटले आहे. सीहोर आणि रायसेन जिल्ह्यांमध्ये बरखेडा आणि बुधनीदरम्यान 20 किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गावर आतापर्यंत 3 बछड्यांसहमवेत 8 वाघांचा मृत्यू झाला आहे. 2015 नंतरच्या रेल्वे दुर्घटनांमध्ये 14 बिबटे आणि एक अस्वलही मृत्युमुखी पडले आहे.

Advertisement
Tags :

.