महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

देशाच्या आणखी एका शत्रूचा मृत्यू

06:14 AM Nov 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सैन्यतळावर झालेल्या हल्ल्याच्या सूत्रधाराचा मृतदेह आढळला : अज्ञातांची कामगिरी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

अलिकडच्या काळात भारताच्या अनेक शत्रूंचा संशयास्पद स्थितींमध्ये मृत्यू होत आहे. 2018 मध्ये जम्मू येथील सैन्यतळावरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार पाकव्याप्त काश्मीरमधील स्वत:च्या घरात मृत आढळून आला आहे. या मृत दहशतवाद्याचे नाव ख्वाजा शाहिद आहे. ख्वाजा शाहिदचा शीर धडावेगळे केलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आहे. काही दिवसांपूर्वी ख्वाजा शाहिदचे अपहरण करण्यात आले होते.

ख्वाजा शाहिद हा  लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर होता आणि 2018 मध्ये जम्मूच्या सुंजवान येथील सैन्याच्या तळावर हल्ला घडवून आणणारा मुख्य सूत्रधार होता. दहशतवाद्यांनी एके-47 रायफल्स, ग्रेनेडसोबत सैन्यतळावर हल्ला केला होता, या दहशतवादी हल्ल्यात 6 सैनिक हुतात्मा झाले होते. ख्वाजा शाहिद उर्फ मियां मुजाहिद हा पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील नीलम खोऱ्याचा रहिवासी होता.

ख्वाजा शाहिदचे अलिकडेच काही अज्ञात बंदुकधाऱ्यांनी अपहरण केले होते. ज्यानंतर ख्वाजा शाहिदचा काहीच सुगावा लागला नव्हता. पाकिस्तानी सैन्य आणि गुप्तचर यंत्रणा आयएसआयकडून ख्वाजा शाहिदचा युद्धपातळीवर शोध घेतला जात होता, परंतु आता त्याचा मृतदेह घरातच आढळून आला आहे.

वेचून वेचून मारले जाताहेत शत्रू

भारताच्या शत्रूंना विदेशात तसेच अन्य ठिकाणी वेचून वेचून मारले जात आहे. अलिकडच्या काळात अनेक दहशतवाद्यांना अज्ञात लोकांनी विदेशी भूमीवर लक्ष्य केले आहे. यात भारतासाठी मोस्ट वाँटेड असलेला शाहिद लतीफ, कैसर फारुख, जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी जहूर इब्राहिम उर्फ जाहिद अखुंद समवेत कॅनडात खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर आणि पाकिस्तानात खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह संधू याचाही समावेश आहे. सर्व प्रकरणांमध्ये मारेकऱ्यांचा शोध लागलेला नाही हे विशेष.

आयएसआय हतबल

मागील 20 महिन्यांमध्ये भारतविरोधात कार्यरत असलेले 18 दहशतवादी मारले गेले आहेत. मागील महिन्यात जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी दाऊद मलिकची उत्तर वजीरिस्तानात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. दहशतवाद्यांचा अशाप्रकारे मृत्यू होत असल्याने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय हतबल ठरली आहे. आयएसआयने स्वत:च्या हस्तकांच्या सुरक्षेकरता त्यांना अन्यत्र हलविल्याचे वृत्त आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article