कळंबा कारागृहातील कैद्याचा मृत्यू
कोल्हापूर :
रक्तदाब कमी झाल्याने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल झालेल्या कळंबा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याचा मृत्यु झाला. मोहम्मद अफजल मोहम्मद जब्बर अन्सारी (वय 48, मुळ रा. सुलतानपूर, उत्तरप्रदेश, सध्या मुंबई) असे त्याचे नाव आहे. त्याच्या मृतदेहाचे गुऊवारी सकाळी न्यायाधीशांच्या उपस्थितीत इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यांची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे.
कैदी मोहम्मद अफजल मोहम्मद जब्बर अन्सारी याचाविरोधी मुंबई येथे पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल झाला होता. या गुह्यात न्यायालयाने त्याला 3 वर्षाची सक्तमुजरीची शिक्षा ठोठाविली होती. त्याला सुमारे पाच महिन्यांपूर्वी मुंबई येथून कोल्हापुरातील कळंबा कारागृहात हलविण्यात आले होते. त्याला शूगर आणि रक्तदाबचा त्रास जाणवू लागल्याने, कळंबा कारागृह प्रशासनाने त्याला उपचारासाठी बुधवारी सकाळी सीपीआरमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा रक्तदाब कमी झाल्याने मृत्यू झाला. याची माहिती कळंबा कारागृह प्रशासनाने त्याच्या नातेवाईकांना कळविली. त्यावऊन त्याची पत्नीसह अन्य नातेवाईक त्वरीत सीपीआर ऊग्णालयात दाखल झाले. त्यानंतर कैदी मोहम्मद अफजल मोहम्मद जब्बर अन्सारी याच्या मृतदेहाचे न्यायाधीशांच्या उपस्थितीत इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याने, त्याच्या मृतदेहावर अत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांनी मृतदेह मुंबईला घेवून गेले.