For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दाणोली साटम महाराजांचा पुण्यतिथी उत्सव ५ मार्चला

02:33 PM Feb 28, 2026 IST | अनुजा कुडतरकर
दाणोली साटम महाराजांचा पुण्यतिथी उत्सव ५ मार्चला
Advertisement

दाणोलीत विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन

Advertisement

ओटवणे प्रतिनिधी
कोकणातील संताचे संत शिरोमणी असलेले दाणोली येथील साटम महाराजांचा ८९ वा पुण्यतिथी सोहळा गुरूवार ५ मार्च रोजी होत आहे. या पुण्यतिथी उत्सवानिमित्त साटम महाराजांच्या समाधी मंदिर आणि निवासस्थानी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डीच्या साईबाबांना समकालिन असलेल्या साटम महाराजांच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह गोवा, कोल्हापूर बेळगाव परिसरातून भाविकांची अलोट गर्दी होते.यानिमित्त समाधी मंदिरात पहाटे ५ वाजता काकड आरती, सकाळी ५:३० वाजता अभ्यंगस्नान, सकाळी ८ वाजता सावंतवाडी संस्थानचे श्रीमंत खेमसावंत भोसले यांच्याहस्ते साटम महाराज समाधी पूजन व विधिवत पाद्यपूजा त्यानंतर सकाळी ८:३० वाजता श्री घाटकर (कोलगाव) यांचे बासरी वादन, सकाळी ९:३० वाजता बुवा श्री बोभाटे (झाराप) व सहकारी यांचे सुश्राव्य भजन, सकाळी १०:३० वाजता बुवा अंकुश सांगेलकर (सांगेली) व सहकारी यांचे सुश्राव्य भजन, सकाळी ११:३० वाजता श्री दळवी बुवा व सहकारी यांचे सुश्राव्य भजन, दुपारी १२:३० वाजता महाआरती व त्यानंतर महाप्रसादास प्रारंभ होणार आहे. दुपारी १ वाजता राधाकृष्ण संगीत साधनाच्या संचालिका सौ विणाताई दळवी व सहकारी यांचा अभंग व भक्तीगीतांचा सुरेख नजराणा, दुपारी २ वाजता बुवा श्री म्हाडगुत (मुंबई) व सहकारी यांचे सुश्राव्य भजन, सायंकाळी ३ वाजता बुवा संदेश भोगटे (झाराप) व सहकारी यांचे सुश्राव्य भजन, सायंकाळी ४ वाजता पुणे येथील ह भ प नातू व त्यांचे सहकारी यांचे सुश्राव्य किर्तन, सायंकाळी ७ वाजता महाआरती, सायंकाळी ७: ३० वाजता साटम महाराज समाधी मंदिर ट्रस्टच्यावतीने दाणोली पंचक्रोशीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा श्रीमंत खेम सावंत भोसले यांच्याहस्ते सत्कार करण्यात येणार आहे.रात्री ८ वाजता प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री ८:३० वाजता दाणोली बाबुराव पाटेकर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री ९:३० वाजता श्री समर्थ साटम महाराजांच्या सवाद्य पालखी मिरवणूकीला प्रारंभ होणार असून त्यानंतर मध्यरात्री २:३० वाजता भावई पारंपारिक दशावतार मंडळाचा (धामापूर) यांचा 'भैरव भैरवी संग्राम' हा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सावंतवाडी संस्थांचे श्रीमंत तथा श्री समर्थ साटम महाराज समाधी मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त खेम सावंतभोसले आणि विश्वस्त युवराज लखम सावंत भोसले तसेच दाणोली बाजारपेठ वासियांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.